डिचोलीत महामार्गावर अनियोजित पद्धतीने होर्डिंग लावले जातायेत. होर्डिंगवर लावण्यावर टीसीपी विभागाचे नियंत्रण असावे. याशिवाय, डिचोलीसाठी स्वतंत्र प्रादेशिक वन अधिकारी असावा कारण सध्या हे क्षेत्र पेडणे आणि वाळपाईवर अवलंबून आहे, अशी माहिती डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सभागृहात दिली.
एसटी समाजातील शेतकऱ्यांना वनजमिनींमध्ये शेती करण्याची परवानगी देण्यात यावी. त्यांची ही मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना त्रास देणे बंद करावे, असे केपेचे आमदार एल्टन डिकोस्ता म्हणाले.
डिकोस्ता पुढे म्हणाले की, ''केपे मार्केटमध्ये दिसणारे बिबट्या आणि जंगली बिसन यांच्या संदर्भात कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र आश्वासन देऊनही काहीही झाले नाही.''
शेवटी डिकोस्ता म्हणाले की, 'सर्प आणि वन्यजीव बचाव पथकांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्यात यावे. त्यांना खूपच कमी वेतन आहे.'
आधी गाभा समिती आणि नंतर आजच्या (5 ऑगस्ट) मंत्रिमंडळ बैठकीतील विरोधानंतर अखेर टीसीपी खात्याची वादग्रस्त दुरुस्ती विधेयक मंत्री राणे यांच्याकडून मागे घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीतही मंत्री खंवटे, मोन्सेरात यांनी हरकत घेतल्याची सूत्रांची माहिती.
करापूर सर्वण येथील अभिनंदन लोढा, सांकवाळ येथील भूतानी आणि रेईश मागूश येथे सुरु असलेले बांधकाम प्रकल्प लवकरात लवकर रद्द करा. आपचे कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस यांची विधानसभेत मागणी.
वादग्रस्त कायदा दुरुस्ती विधेयक अखेर पर्यटनमंत्री विश्वजित राणे यांच्याकडून मागे घेण्यात आले. या दुरुस्ती विधेयकावरुन सरकार आणि मंत्री विश्वजित राणे यांच्यावर मोठ्याप्रमाणावर टीका झाली.
राज्यात सरकारने Tiger Reserve घोषित करावा, अशी मागणी भाजपा आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी विधानसभेत केली.
कारापुर येथील विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक शाळा व मावळींगे येथील जे. जे. राणे प्राथमिक शाळेत 350 हून अधिक विद्यार्थी शिकतात. तिथे पूर्णवेळ सुरक्षारक्षक आणि सफाई कर्मचारी देण्याची आमदार प्रेमेंद्र शेट यांची मागणी.
सरकारकडून गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्ती विकण्यास बंदी आहे. तरी देखील बाहेरील राज्यातून सर्रास गणेशमूर्त्या आणून त्यांची विक्री चालू आहे. हे थांबवण्यासाठी आता गोव्याच्या सीमेवरच अशा प्रकारच्या प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्त्यांना अडवून बंदी घातली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिले.
केंद्रीय मंत्री अर्जून राम मेघवाल यांच्याकडून राज्यसभेत अनुसूचित जमातीच्या जनगणनेसाठी जनगणना आयुक्त नियुक्त करण्यासाठीचे विधेयक आणले. यामुळे 2027 पर्यंत गोव्यात अनुसुचित जमातीच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचे आमदार गणेश गावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोने प्रियोळातील सर्व्हे क्रमांक 255/2 या Natural Cover Overlapping, No Devlopment Slop डोंगर कापणी प्रकरणात जमीन मालक अजय नाईक याच्यावर गुन्हा नोंद. टीसीपी अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पहाणीनंतर कारवाई.
केरळमधील वायनाड येथील भूस्खलन झालेल्या ठिकाणी बलराम चॅरीटेबल फाऊंडेशनच्यावतीने 200 कार्यकर्त्यांना घेऊन 'श्रमधाम' योजनेअंतर्गत घरे उभारणार. सभापती रमेश तवडकरांची सभागृहात माहिती. मोहीमेत सहभागी होण्याबाबत लोकांना आवाहन.
भूमिगत विजवाहिन्या घालताना रस्ते खोदतात. मात्र त्यानंतर खोदलेले रस्ते वर्षभर बुजवले जात नाहीत. वीजमंत्र्यांनी भूमिगत विजवाहिन्या घालताना, खोदलेले रस्ते बुजवण्याची परवानगीही सोबत घ्यावी. आमदार विरेश बोरकर यांची मागणी.
कोने प्रियोळ येथे सुरु असलेल्या डोंगर कापणीच्या वृत्ताची दखल घेत टीसीपी अधिकाऱ्यांकडून आज (5 ऑगस्ट) सकाळी पाहाणी. खात्याकडून कसलीच परवानगी नाही. कोणती फाईलही नाही. सर्व प्रकार बेकायदेशीर. मंत्री विश्वजीत राणेंची माहिती.
अक्षय पात्रासोबत केलेल्या एमओयूची प्रत मागणाऱ्या माझ्या अतारांकीत प्रश्नाला सरकारने परवानगी दिली नाही. एफडीएने मला उत्तर दिले आहे की ते मीड डे मीलची गुणवत्ता तपासत नाहीत- युरी आलेमाव.
'अक्षयपात्रा' on Board घेतले आहे. मात्र अजून त्यांना कंत्राट दिलेले नाही. भविष्यात पूर्णवेळ शाळा सुरु झाल्यास दुपारचे जेवण अक्षयपात्राकडून घेऊ शकतो. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांची विधानसभेत माहिती.
राज्यात सेल्फ हेल्प ग्रुप शाळांना मध्यान्ह आहार पुरवठा करतात. त्यांचा आहार कायम राहणार. त्यांनी फक्त आहाराचा दर्जा चांगला ठेवणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे विधानसभेत प्रतिपादन.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.