Goa Assembly Monsoon Session 2023: प्रादेशिक पक्षच 'गोयंकर'पण राखू शकतात, जनतेच्या समस्या सोडवण्यात सरकार सपशेल अपयशी

विजय सरदेसाई : जनतेच्या सामान्य प्रश्‍नांना सरकारला योग्य उत्तरे देता आलेली नाहीत,
Vijay Sardesai
Vijay SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Monsoon Session 2023 : सरकारचे विधानसभेतील कामकाज पाहता ते विरोधकांच्या अनेक प्रश्‍नांवर निरुत्तर झाले आहेत. जनतेच्या सामान्य प्रश्‍नांना सरकारला योग्य उत्तरे देता आलेली नाहीत, त्यामुळे जनतेच्या नजरेतून सरकारची विकेट पडली असल्याचे विधान गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केले. ते ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

सरदेसाई म्हणाले, वास्तविक हे सरकार एक इव्हेंट मॅनेजमेंट सरकार बनले आहे. ज्यावेळी आमदार सरकारच्या विरोधात असतो, त्यावेळी सरकारचे पितळ जनतेसमोर उघडे पाडणे हे त्याचे कर्तव्य असते आणि तेच विरोधक म्हणून आम्ही करत आहोत.

गोव्याची वर्तमान स्थिती पाहता गोव्याचे राष्ट्रीयीकरण केले जात आहे. गोव्याचे अस्तित्व, ओळख बिघडली आहे. अनेक ठिकाणी परप्रांतीयांची मक्तेदारी पाहायला मिळते. गोव्याचे प्रश्‍न सोडवायचे असतील तर प्रादेशिक पक्षांना बळकटी मिळणे गरजेचे आहे.

स्थानिक समस्या राष्ट्रीय पक्ष सोडविणार नाहीत. मात्र, हे गोमंतकीय जनतेने ठरवायचे आहे. जर आम्हाला गोंयकारपण राखायचे असेल तर प्रादेशिक पक्षांना बळकटी देणे गरजेचे असून हे केवळ जनतेच्या हातात असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

Vijay Sardesai
Goa Monsoon - मुसळधार पावसामुळे मयेतील भात पिकाचे नुकसान | Gomantak TV

गावडेंनी दिशाभूल केली

४ कोटींत उभारलेल्या कला अकादमीच्या पुनर्बांधणीसाठी ९० कोटी लागतात आणि तरीदेखील तिच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळते? त्यामुळे अशा प्रकारचे प्रकल्प हे सरकारच्या भ्रष्टाचारांची प्रतिके बनत आहेत.

कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी विधानसभेत चुकीची विधाने करत सभागृहाची दिशाभूल केली, त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी करत असल्याचे सरदेसाई यांंनी सांगितले.

विरोधक म्हणून कॉंग्रेस आमदारांसोबत सरकारला विविध प्रश्‍नांवरून घेरण्याबाबतत चर्चा करून व्यूहरचना बनविली जाते. लोकसभेच्या अनुषंगाने विचार केला असता कॉंग्रेसने खासदारकी उमेदवारीसाठी नवा चेहरा द्यावा. लोकसभेच्या अनुषंगाने कॉंग्रेसने गोवा फॉरवर्डशी चर्चा केल्यास परिस्थितीनुरूप योग्य तो निर्णय आम्ही घेऊ.

विजय सरदेसाई, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com