Goa Bhumiputra Bill: गोवा सरकारकडून वादग्रस्त भूमिपुत्र विधेयक मागे, विरोधकांनी मागितले स्पष्टीकरण

कायदामंत्री नीलेश काब्राल यांनी भूमिपुत्र विधेयक मागे घेण्यासाठी विधेयक मांडले आणि आवाजी मतदानाने ते मागे घेण्यास परवानगी देण्यात आली.
Goa govt withdraws controversial Bhumiputra bill
Goa govt withdraws controversial Bhumiputra billDainik Gomantak
Published on
Updated on

Goa govt withdraws controversial Bhumiputra bill: गोवा सरकारने वादग्रस्त भूमिपुत्र विधेयक मागे घेतले. विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारला वादग्रस्त 'गोवा भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक 2021' मागे घेण्यास परवानगी दिली. दरम्यान, विरोधकांनी विधेयक मागे घेण्याचे कारण स्पष्ट करण्याची मागणी केली.

कायदामंत्री नीलेश काब्राल यांनी भूमिपुत्र विधेयक मागे घेण्यासाठी विधेयक मांडले आणि आवाजी मतदानाने ते मागे घेण्यास परवानगी देण्यात आली.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारला हे विधेयक मागे का घेण्यात आले याचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले. फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी देखील कायदेमंत्र्यांनी विधेयक माघारी घेण्याचे कारण द्यावे अशी मागणी केली.

तसेच, विधेयक गोमन्तकीयांसाठी नव्हे तर बिगर गोमन्तकीयांसाठी आणले होते असेही सरदेसाई म्हणाले. दरम्यान, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने हे वादग्रस्त विधेयक मागे घेण्यास मंजुरी दिली होती.

Goa govt withdraws controversial Bhumiputra bill
President Murmu Goa Visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार गोवा दौऱ्यावर; दिवस, उद्देश जाणून घ्या

30 जुलै 2021 रोजी, सदनाने हे विधेयक मंजूर केले होते पण, प्रशासकीय कारणास्तव हे विधेयक राज्यपालांच्या संमतीसाठी पाठवण्यात आले नाही.

नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात विरोधकांच्या मागणीनंतर सरकार हे विधेयक मागे घेण्याची शक्यता पडताळून पाहणार असल्याचे महसूलमंत्र्यांनी सांगितले होते. अखेर आज वादग्रस्त 'गोवा भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक 2021' मागे घेण्यास परवानगी देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com