गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा आणि इतर पोलीस स्थानके यांनी मिळून राज्यात 1 जानेवारी 2020 ते 15 जून 2024 या कालावधीत 633 गुन्हे दाखल करुन 746 जणांना अटक केली. तसेच, 28 प्रकरणातील 37 आरोपींनी कोर्टाने शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्यांपैकी सर्वाधिक 28.28 टक्के म्हणजे 211 गोव्यातील स्थानिक आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या लेखी उत्तरात विधानसभेत दिली.
दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी तारांकित लेखी प्रश्न दाखल केला होता. गोवा पोलिसांच्या (Goa Police) विविध विभागाच्या पोलिसांनी गेल्या चार वर्षात 633 गुन्हे दाखल केले. ज्यामध्ये 746 जणांना अटक करण्यात आली. त्यात 211 गोव्यातील स्थानिक, 411 परप्रांतीय तसेच 116 परदेशी नागरिकांना समावेश आहे. 2021 मध्ये 121 गुन्हे दाखल करुन 138 जणांना अटक करण्यात आली. 2022 मध्ये 189 जणांना अटक करण्यात आली होती. 2023 मध्ये 140 गुन्हे दाखल 166 जणांना अटक करण्यात आली. तर 2024 मध्ये 15 जूनपर्यंत 70 गुन्हे दाखल करुन 76 जणांना अटक करण्यात आली.
तसेच, कोर्टाने (Court) गेल्या साडे चार वर्षांमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यातील केवळ 28 प्रकरणातील 37 आरोपींना शिक्षा ठोठावली. ज्यामध्ये 5 जण गोव्यातील स्थानिक, 26 परप्रांतीय तर 6 परदेशी नागरिकांना समावेश आहे. विशेष म्हणजे, एका प्रकरणात संशयिताचा मृत्यू झाल्याने कोर्टाने प्रकरण बंद केलं. तर पुराव्याच्या अभावामुळे 6 जणांना आरोपातून मुक्त करण्यात आले. याशिवाय, तीन प्रकरणात पुराव्यांच्या कोर्टाने सहा जणांनी आरोपातून सुटका केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.