देशभरात सध्या पावसानं थैमान घातलं आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. खासकरुन पश्चिम किनारपट्टीतील राज्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. गोवा, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यात पावसानं हाहाकार माजवला आहे. यामध्येही केरळमधील वायनाड येथील भूस्खलनाच्या घटनेने अवघा देश हादरला. आताही वायनाडमध्ये संततधार सुरुच आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता वायनाड दुर्घटनेतील लोकांसाठी देशभरातून मदत पोहोचत आहे. यातच, गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकरही वायनाड दुर्घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.
दरम्यान, केरळमधील वायनाड येथील भूस्खलन झालेल्या ठिकाणी बलराम चॅरीटेबल फाऊंडेशनच्यावतीने 200 कार्यकर्त्यांना घेऊन 'श्रमधाम' योजनेअंतर्गत घरे उभारणार असल्याची माहिती सभापती रमेश तवडकरांनी सभागृहात दिली. एवढ्यावरच न थांबता सभापती तवडकरांनी या मोहीमेत सहभागी होण्यासाठी गोव्याच्या जनतेला आवाहन केले आहे.
वायनाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा 350 च्या पार गेला आहे. 200 हून अधिक जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात बचावपथकाला यश आले आहे. तर बेपत्ता असणाऱ्या लोकांची गिनतीच नाही. पंतप्रधान कार्यालयाकडून या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये, तर जखमींना 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आलीय. तर दुसरीकडे, केरळ सरकारकडून मदतीसह हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलाय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.