Goa Congress: गोवा कॉंग्रेसच्या प्रभारीपदी माणिकराव ठाकरेंची नियुक्ती

Goa Congress: चोडणकरांना मिळाली चार राज्यांची जबाबदारी
Manikrao Thakare
Manikrao ThakareDainik Gomantak

Goa Congress: गोवा कॉंग्रेसच्या प्रभारीपदी माणिकराव ठाकरेंची नियुक्ती झाल्याची महत्वाची बातमी समोर येतेय. तर काँग्रेस नेते गिरीश चोडणकरकडे 4 राज्यांची जबाबदारी दिली असल्याचीही माहिती समजतेय.

त्रिपुरा, सिक्कीम, मणिपूर आणि नागालॅण्ड या चार राज्यांच्या प्रभारीपदी चोडणकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. चोडणकरांना दिलेल्या नव्या जबाबदारीमुळे त्यांची गोव्यातून लोकसभा लढविण्याच्या विचाराला पूर्णविराम मिळाला असल्याचे बोलले जातेय.

ठाकरेंची नियुक्ती झाल्यानंतर अमित पाटकर यांनी त्यांचे अभिनंदन केलेय. गोवा काँग्रेस संघटन तळागाळात मजबूत करण्यासाठी तुमच्यावर जी नवीन जबाबदारी सोपवण्यात आलीय त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशा शब्दात पाटकरांनी ट्विट केलंय.

त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषवलेले आहे. तेलंगणामध्ये झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने 119 पैकी 64 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं.

कॉंग्रेसच्या या यशानंतर तेलंगणाच्या प्रभारी पदाची जबाबदारी असलेल्या माणिकराव ठाकरेंचं नाव पुन्हा चर्चेत आलं. मंत्री, प्रदेशाध्यक्ष, प्रभारी अशी अनेक पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. महाविकास आघाडीच्या काळात काही वर्ष ते विधानपरिषदेचे उपसभापती राहिले असून आता त्यांची गोवा कॉंग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आलीय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com