South Goa Anti-Smoking Campaign: समुद्र किनारे, मैदानांवर धूम्रपान करणाऱ्यांना दणका; दक्षिण गोव्यात पोलिसांची धडक मोहीम

Goa public smoking penalties: सार्वजानिक ठिकाणी धूम्रपान करणे आणि थुंकण्याचे प्रकार थांबावेत म्हणून दक्षिण गोव्यात कडक मोहीम राबविण्यात येत आहे.
South Goa Anti-Smoking Campaign: सार्वजनिक धूम्रापान करणाऱ्यांना लागला चाप! दक्षिण गोव्यात धडक मोहीम; लाखोंचा दंड वसूल
Stop SmokingDainik Gomantak
Published on
Updated on

सार्वजानिक ठिकाणी धूम्रपान करणे आणि थुंकण्याचे प्रकार थांबावेत म्हणून दक्षिण गोव्यात कडक मोहीम राबविण्यात येत असून यंदाच्या जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत एकूण ४४०२ लोकांवर कारवाई केली आहे. आणि त्यांच्याकडून तब्बल ४.४० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार २०२३ साली पूर्ण वर्षभरात असे गुन्हे करणाऱ्या ६००२ जणांवर कारवाई केली होती. तर २०२२ साली ६६२५ जणांवर कारवाई केली होती. बस स्थानक, सरकारी कार्यालये, समुद्र किनारे, ही कारवाई करण्यात आली आहे सार्वजानिक उद्याने आणि मैदानावर धूम्रपान करणे तसेच सार्वजानिक ठिकाणीं पानाच्या पिचकाऱ्या मारून घाण करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

South Goa Anti-Smoking Campaign: सार्वजनिक धूम्रापान करणाऱ्यांना लागला चाप! दक्षिण गोव्यात धडक मोहीम; लाखोंचा दंड वसूल
South Goa Lawyers Association: दलालगिरी बंद करून म्युटेशन प्रक्रिया पारदर्शक करा; वकील संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

दक्षिण गोव्यातील प्रमुख पर्यटन केंद्र असलेल्या काणकोण शहराचा दुसरा क्रमांक लागत असून या पोलिस स्थानकाच्या कक्षेत जानेवारी ते जुलै या कालावधीत अशा प्रकारच्या गुन्ह्यात सामील असलेल्या ५०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील बहुतेक गुन्हे समुद्र किनाऱ्यावर नोंद झाले आहेत. त्या पाठोपाठ वास्को रेल्वे पोलीस स्थानकाचा क्रमांक लागत असून या पोलीस स्थानकाच्या कक्षेत ४५७ जणांवर कारवाई केली. मडगाव शहराचा चौथा क्रमांक लागत असून इथे ३५८ प्रकरणे नोंद झाली.

फोंड्यात सर्वाधिक, मुरगावात कमी गुन्हे

फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत अशा प्रकारची सर्वात अधिक म्हणजे ७३० प्रकरणाची नोंद झाली आहे. इतर पोलिस स्थानकावर नोंद झालेले गुन्हे म्हणजे कुळे पोलिस स्थानक (३३९), कोलवा (३१३), कुंकळी (२९१) मायणा कुडतरी (२७३), वास्को (२२३), सांगे (२०६), फातोर्डा (१७१), दाबोळी (१४७), म्हार्दोळ (११८) व कुडचडे (१०६) अशी प्रकरणे नोंद आहेत. त्यामानाने केपे (८१), वेर्णा (१४) आणि मुरगाव (१३) या पोलीस स्थानकाच्या कक्षेत कमी गुन्हे नोंद झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com