Cashew Price : काजूची आधारभूत किंमत वाढवावी; जि. पं. बैठक

Cashew Price : केपे क्रीडा संकुलाबद्दल सिद्धार्थ गावस देसाई यांनी सांगितले की, निवडणुकांमुळे हे क्रीडा संकुल बंद ठेवावे लागते. तेव्हा निवडणूक प्रक्रिया येथे न करता दुसरीकडे घेण्‍याची विनंती सरकारला करावी.
cashew
cashewGomantak Digital Team

Cashew Price :

सासष्टी, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत समितीची आज मडगावात बैठक होऊन तीत अनेक निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर यांनी पत्रकारांना दिली. यंदा काजूचे पीक कमी प्रमाणात आल्‍याने उत्‍पादक चिंतेत सापडले आहेत.

त्यामुळे काजूच्या आधारभूत किमतीत सरकारने वाढ करावी अशा आशयाचे पत्र जिल्हा पंचायतीमार्फत कृषी खात्याला पाठवावे असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

काजूच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याची मागणी करणारा ठराव रिवणचे जिल्हा पंचायत सदस्य सुदेश केपेकर यांनी मांडला होता. लोकसभा निवडणुकीमुळे ही बैठक एक महिना उशिरा झाल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

cashew
Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

त्यामुळे या बैठकीत मागील खर्चाला मंजुरी देण्यात आली.

केपे क्रीडा संकुलाबद्दल सिद्धार्थ गावस देसाई यांनी सांगितले की, निवडणुकांमुळे हे क्रीडा संकुल बंद ठेवावे लागते. तेव्हा निवडणूक प्रक्रिया येथे न करता दुसरीकडे घेण्‍याची विनंती सरकारला करावी.

सध्‍या जिल्हा पंचायतीसाठी जे अभियंते नियुक्त केलेले आहेत, ते पूर्ण वेळ नाहीत. आठवड्यातून दोन दिवसच ते येतात. त्यामुळे कंत्राटदारांची बिले मंजूर करून घेण्यासाठी विलंब होतो. आम्ही सरकारकडे जादा कर्मचारी वर्गाची मागणी केली आहे. जिल्हा पंचायतीच्या या कार्यकाळाला केवळ दीड वर्ष बाकी असून विकासकामे खूप आहेत.

- सुवर्णा तेंडुलकर, अध्‍यक्षा (दक्षिण गोवा जिल्हा पंचायत)

रेशनकार्डे रद्द न करण्‍याचा ठराव

जे लोक रास्तभाव दुकानातून धान्‍य आणत नाहीत, त्यांची रेशनकार्डे रद्द केली जातात. तेव्हा एखाद्या कामासाठी अधिकृत कागदपत्र म्हणून त्याचा वापर करता येत नाही. त्याबद्दलही जिल्हा पंचायतीने सरकारशी बोलून ही रेशनकार्डे रद्द करू नयेत अशी मागणी करण्यात यावी असा ठराव घेतला.

त्याचबरोबर कृषीकार्ड मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करावी असाही ठराव बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com