Goa Agriculture: व्हर्जिन कोकोनट ऑईल हे आरोग्यासाठी वरदान असल्याचे नव्या संशोधनाअंती स्पष्ट झाले आहे. अनेक आजारांमध्ये ते औषध म्हणून उपयोगात येऊ शकते. शिवाय ते नियमित आहारातही वापरता येते. राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा नवा उद्योग असून त्याबाबतच्या प्रशिक्षणाची सोय ओल्ड गोव्याच्या आयसीएआर-कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आल्याची माहिती गृहविज्ञान वैज्ञानिक सुनेत्रा तळावलीकर यांनी दिली.
तळावलीकर म्हणाल्या की, व्हर्जिन कोकोनट ऑईल हे कोणत्याही रासायनिक प्रक्रियेशिवाय ओल्या खोबऱ्यापासून तयार केले जाते. ओल्या खोबऱ्यापासून मिळविलेल्या दुधापासून विशिष्ट तापमानाच्या साहाय्याने हे तेल काढले जाते. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असून लॉरिक ऑसिडचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा जास्त असते, जे आईच्या दुधात मोठ्या प्रमाणात असते.
या तेलात रोगप्रतिकारशक्ती मोठी असते. हे तेल मानवी शरीरात केल्यानंतर त्यापासून मोनोलॉरिन नावाचे घटक द्रव्य तयार होतात. हे शरीरात बाहेरून येणाऱ्या विषाणू, जिवाणूंवर नियंत्रण मिळवितात. शिवाय या तेलात मोठ्या प्रमाणावर खनिजे, व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्साईडही असते. हे तेल पूर्णतः नैसर्गिक आहे.
प्रामुख्याने साबण उद्योग, लोशन, क्रीम, लीप बाम यामध्ये या तेलाचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो. शिवाय केसांना आणि शरीराला मसाज करण्यासाठीही हे तेल वापरले जाते. हे अत्यंत शुद्ध स्वरूपात असल्याने चिकट व डाग पडणारे नसते. सध्या त्याचा उपयोग खाण्यासाठी केला जात आहे.
सुनेत्रा तळावलीकर, गृहविज्ञान वैज्ञानिक-
राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा नवा उद्योग अत्यंत फायदेशीर आहे. तो मोठ्या प्रमाणात तसेच घरगुती स्वरूपातही उभारला जाऊ शकतो. यासाठी आयसीएआरच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.