मडगाव : नुवे मतदारसंघात (Nuvem Constituency) विकास (Development) अजूनही बराच दूर आहे. औद्योगिकरणाच्या (Industrial) प्रभावाखाली असलेला हा मतदारसंघ आपला चेहरा हरवून बसला आहे. त्यामुळे कृषीसमृद्ध (Agriculture Development) असूनही मतदारसंघ ओळख हरवत चालला आहे. विधानसभा मतदारसंघांच्या झालेल्या पुनर्रचनेत लोटली मतदारसंघाचा लोप होऊन हा नवा मतदारसंघ तयार केला गेला. मडगाव शहराला भिडून असलेल्या या मतदारसंघाचा नुवे पंचायतीचा भाग मडगाव नगरपालिकेत समाविष्ट करावा, असे प्रयत्न मध्यंतरीच्या काळात झाले होते. पण, एका वर्गाने त्याला कडाडून विरोध केला व त्यामुळे नंतर ते प्रयत्न सोडून दिले गेले.
प्रत्यक्षात जेथे या मतदारसंघाची हद्द सुरू होते व जेथे संपते तो संपूर्ण प्रदेश (वेर्णा पठार सोडले तर) शेतीप्रधान आहे. हल्लीच्या काळातसुद्धा बराच पट्टा शेतीने डुलताना दिसून येतो. नव्या महामार्गासाठी शेतीची जमीन ताब्यात घेतली जाऊ नये म्हणून तेथील लोकांनी आटोकाट प्रयत्नही केले, पण ते वाया गेले. त्याचे कारण डोंगर सोडला तर तेथे बिगर शेतजमीनच उपलब्ध नव्हती. त्या वरून येथील शेती लागवडीची कल्पना येते.
सुविधांवर ताण
हल्लीच्या काळात वेर्णा औद्योगिक वसाहत केवळ नावारुपासच आली नाही तर ती प्रचंड प्रमाणात विस्तारली व त्याचे परिणाम या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दिसून आले. त्या वसाहतीतील उद्योगात काम करणारे परप्रांतीय लोक सभोवतालच्या पंचायत क्षेत्रात राहायाला लागले. त्यामुळे घरांची, सदनिकांची मागणी वाढली व त्यांतून घरांची, दुकानांची संख्याही वाढली. त्यातील काही कायदेशीर परवाने घेऊन तर बहुतेक विनापरवाना आहेत. अशाप्रकारे लोकसंख्या वाढली व साहजिकच पायाभूत सुविधांवर ताण आला. परिणामी कचरा, सांडपाणी, रस्ते, पदपथ सारख्या समस्या उभ्या राहिल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.