Panaji : मंदिरे आपल्या समाजासाठी ज्ञानार्जन आणि मार्गदर्शनाच्या संस्था आहेत. समाजातील आस्तिक वृत्ती वाढविण्याबरोबरच संस्कारक्षम आणि जबाबदार माणसे घडविण्याचे कार्य इथल्या मंदिर व्यवस्थेतून घडले आहे, असे उद्गार प्रदेश भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांनी मेरशी येथे काढले.
मेरशी येथील श्री घनश्याम दर्शन संगीत विद्यालयाच्या ४३ व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्मीभाट मेरशी येथील सातेरी ग्रामदेवता मंदिराच्या मंडपात हा कार्यक्रम शनिवारी पार पडला. यावेळी व्यासपीठावर कला संस्कृती खात्याचे उपसंचालक अशोक परब, उद्योजक देवानंद नाईक,
डॉ आनंद गोवेकर, सुनील शेट, दुर्गाकुमार नावती, उद्योजक किशोर नार्वेकर, जि प सदस्य गिरीश उस्कैकर, पंचसदस्य सुशांत गोवेकर, समाजसेविका हेमांगी गोलतकर, विठ्ठल खांडोळकर, दुर्गेश शिरोडकर, संतोष नाईक तसेच संस्थेचे सचिव पुंडलिक कळगुटकर उपस्थित होते.
यावेळी अशोक परब यांचा दामू नाईक यांच्याहस्ते शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तर दामू नाईक यांना सन्मानचिन्ह देऊन संस्थेतर्फे गौरविण्यात आले. यावेळी लग्नगीत स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
ॲड. राघवेंद्र कळंगुटकर यांनी स्वागत केले. सिद्धी उपाध्ये व दामोदर केरकर यांनी सूत्रसंचालन केले.पुंडलिक कळंगुटकर यांनी आभार मानले.
प्रादेशिक लोककलांचा अभ्यास ही काळाची गरज असून या क्षेत्रात संशोधनासाठी भरपूर वाव आहे. लोककला ही निसर्गाशी जोडलेली असून समाजमनाशी ती एकरूप झालेली आहे.
अशोक परब, कला संस्कृती उपसंचालक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.