Gavandali Flyover: नागरिकांना दिलासा! वाहतूक कोंडी सुटणार; गवंडाळीत रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला वेग

Gavandali Old Goa Road: कामासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या यंत्रसामग्रीचा वापर सुरू असल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. परिणामी, सकाळी व सायंकाळी कार्यालयीन व शाळेच्या वेळेत वाहतुकीची कोंडी होते.
Gavandali railway bridge
Gavandali railway flyoverDainik Gomantak
Published on
Updated on

खांडोळा: गवंडाळी येथे प्रस्तावित रेल्वे उड्डाण पुलाचे काम वेगाने सुरू झाले आहे. या पुलामुळे गवंडाळी–जुने गोवे मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर सुटणार असून, नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या कामामुळे या मार्गावर वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांची गरज आहे, असे वाहनचालकांचे मत आहे.

कामासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या यंत्रसामग्रीचा वापर सुरू असल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. परिणामी, सकाळी व सायंकाळी कार्यालयीन व शाळेच्या वेळेत वाहतुकीची कोंडी होते. दोन-तीन किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी नागरिकांना दुप्पट वेळ द्यावा लागत असल्याची तक्रार वाहनचालकांनी केली आहे.

यात भर म्हणजे गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. रेल्वे मार्गाजवळच्या वळवलेल्या रस्त्यावर ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने दुचाकीस्वार व चारचाकी वाहनचालकांची मोठी कोंडी होत आहे. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

पुलाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर एक वर्षांसाठी हा रस्ता बंद करण्यात आला होता. परंतु अचानक वाहनचालकांच्या सोयीसाठी सकाळी दहापूर्वी व संध्याकाळी ५ नंतर हा रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला होता.

Gavandali railway bridge
Goa Road: गोव्यात 5 वर्षांसाठी केलेले रस्ते, एका पावसात वाहून जातात! कंत्राटदाराच्या नावाने रडून उपयोग काय?

परंतु अलीकडे हा रस्ता २४ तास खुला करण्यात आल्यामुळे वाहनांची संख्या वाढली आहे. शिवाय रेल्वे येण्याच्या वेळेला फाटक बंद होते, तेव्हा दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागतात. रेल्वे गेल्यानंतर वाहनांची ये-जा सुरू होते. परंतु त्यावेळी फाटकाजवळ वाहनांची कोंडी होते. कारण दोन्ही बाजूला पुलांचे काम सुरू असल्यामुळे रस्ता अरुंद झालेला आहे, शिवाय तो खूपच कच्चा आहे. पावसात रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

Gavandali railway bridge
Chorla Belgaum Road: चोर्लाघाट–बेळगाव रस्ता धोकादायक! खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था; कर्नाटकचे निकृष्ट काम

वाहतूक पोलिस हवा!

येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची गरज आहे. दुचाकी वाहने बिनधास्तपणे धावतात, तेव्हा चारचाकी वाहनांना थांबावे लागते. त्यामुळे वाहनांची रांग वाढत जाते. कधी कधी एखादी रेल्वे येऊन गेल्यावरसुद्धा वाहनांची रांग संपत नाही, पुन्हा रेल्वेचे फाटक बंद होते. तेव्हा वाहनांची अधिक मोठी रांग लागते, असा प्रकार सकाळ-संध्याकाळी होते, तेव्हा वाहतूक पोलिस तैनात झाल्यास वाहतुकीत शिस्त येईल, अशी अपेक्षा वाहनचालकांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com