Margao Garbage : मडगाव परिसरातील झऱ्यांना कचऱ्याचे ग्रहण ; स्थानिकांत संताप

Margao Garbage : तळेबांद येथील झर कुलूपबंद अवस्थेत आहे. मात्र शहरी भागात या झरी असूनही यांची योग्य काळजी न घेतल्याने स्थानिकांना या झऱ्याच्या स्नानापासून वंचित रहावे लागत आहे.
Margao
MargaoDainik Gomatnak

Margao Garbage :

लक्ष्‍मीकांत गावणेकर

फातोर्डा, मडगाव परिसरातील झऱ्यांची दुरवस्‍था झालेली असून दवर्ली येथील पाणथळ झरीत मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे, ताळसांझर येथील झरीच्या आजूबाजूला झुडपांची वाढ झाली आहे.

तर तळेबांद येथील झर कुलूपबंद अवस्थेत आहे. मात्र शहरी भागात या झरी असूनही यांची योग्य काळजी न घेतल्याने स्थानिकांना या झऱ्याच्या स्नानापासून वंचित रहावे लागत आहे.

आके पॉवर हाऊसपासून काही अंतरावर दवर्ली येथील पंचायत क्षेत्रात बारामाही वाहणारी स्विमिंग पूल आकाराची झर आहे. या झरीची खोली दोन ते तीन मीटर अशी असून रुंदी तीन ते चार मीटर आहे.

Margao
Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

या झरीमध्‍ये काहीजण पोहण्‍याचे शिक्षणही घेतात. तर काहीजण पाेहण्‍यासाठी, स्‍नान करण्‍यासाठी ही झर उपयुक्त आहे. मात्र या झरीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा,

खाली दारूच्या बाटल्या, बाटल्‍यांच्‍या काचा व अन्य प्रकारचा घातक कचरा साचला आहे. संबंधित पंचायतीने योग्य देखरेख न घेतल्याने स्थानिकांना ही झर जवळ असूनही उन्हाळ्यात स्नानापासून वंचित रहावे लागत आहे.

स्थानिक रहिवाशी सांतान म्हणाले, या झरीचे पाणी बारमाही सतत वाहत असते. या झरीच्या वाहणाऱ्या पाण्याचा उपयोग येथील शेतकरी भाजी लागवडीसाठी करीत आहेत. मात्र, प्लास्टिकचा व प्लास्टर ऑफ पॅरिसचा आरोग्याला हानिकारक घटक शेतीत मिसळत असल्याने येथील शेतीही धोक्यात आली आहे.

लहानपणी १९८० च्या काळात आपल्या वडिलांनी या झरीत पोहायला शिकविले. तेव्हा या झरीत कचराच दिसत नव्हता. त्यावेळी पाणी पूर्णपणे शुद्ध आणि नितळ होते. आता मात्र या झरीची दुरवस्था झाली आहे.

-मिंगेल फर्नांडिस,

स्थानिक रहिवाशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com