Baina Beach Goa : बायणा किनाऱ्याला कचऱ्याचे ग्रहण; पोलिस नेमण्याची शिफारस करणार

Baina Beach Goa : बायणा समुद्र किनारी रोज पहाटे व दुपारनंतर पालिका सफाई कामगारांमार्फत स्वच्छता केली जाते.
Baina Beach Goa  Garbage
Baina Beach Goa GarbageDainik Gomantak
Published on
Updated on

Baina Beach Goa : वास्को, मुरगाव - वास्को बायणा समुद्र किनारी कचरा समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बायणा समुद्र किनारी शिक्षित पर्यंटकांकडून सर्रास कचरा टाकण्याचे प्रकार वाढत आहे.

मुरगाव नगराध्यक्षांनी कचरा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी गोवा पर्यटन विभाग व राज्य गृह विभागाकडे बायणा समुद्र किनारी पर्यटक पोलिस नेमण्यासाठी शिफारस करणार असल्याचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी सांगितले.

Baina Beach Goa  Garbage
Accidents in Goa - राज्यात दोन भीषण अपघातात दोनजणांनी गमावला जीव | Gomantak TV

मुरगाव पालिकेने बायणा किनारच्या कचरा समस्येवर तोडग्यासाठी उपाय योजल्याचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी सांगितले. बायणा समुद्र किनारी रोज पहाटे व दुपारनंतर पालिका सफाई कामगारांमार्फत स्वच्छता केली जाते. परंतु सायंकाळपासून रात्री येणारे पर्यटक व नागरिक पिशव्या, बाटल्या टाकून जातात.

कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य पर्यटन विकास मंडळ व राज्य गृह विभागाकडे बायणा समुद्र किनारी पर्यटक पोलिस नेमण्याची शिफारस करण्यात येणार आहे.तसेच बायणा समुद्र किनारी कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणखी कचरा कुंड्या ठेवणार

-गिरीश बोरकर,नगराध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com