म्हापसा कळंगुटमधील एका हॉटेलमधून कॉल सेंटर चालविणाऱ्या सात जणांच्या आतंरराज्य टोळीस गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने गजाआड केले. या संशयितांकडून पोलिसांनी राऊटर, लॅपटॉप व इतर तांत्रिक साहित्य जप्त केले.
बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून कर्ज देण्याची बतावणी तसेच अॅमेझोन, बँकचे कर्मचारी असल्याचे भासवून अमेरिकेतील नागरिकांना गंडविले जायचे. सविस्तर माहितीनुसार, कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये बनावट कॉल सेंटर कार्यरत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना तांत्रिक निरीक्षणानंतर मिळाली.
त्यानुसार, छापा टाकून पोलिसांनी सात जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये विशाल वाघेला (३४, गुजरात), आचार्य बालकृष्ण (२८, गुजरात), ए. पुलोटो आओमी (२०, नागालँड), धनंजय सिंग (२७, राजस्थान), चुनजांग लुंग रोंगमेई (३१, आसाम), इनोवी झिमोमी (२१, नागालँड) व विकिटो किहो (२१, नागालँड) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी संशयितांकडून चार लॅपटॉप, एक राऊटर, एक डी-लिंक स्विच जप्त केला. हा मुद्देमाल सायबर फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. सायबर क्राईम पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर हे पुढील तपास करताहेत.
कर्ज देण्याच्या आमिषाने घालायचे गंडा
संशयित हे अमेरिकेतील नागरिकांना व्हाईस कॉल करायचे व जे कॉल चालू ठेवायचे त्यांना पैसे ट्रान्सफर करण्यास प्रवृत्त करायचे. ही या संशयितांच्या गुन्ह्याची ‘मोडस ऑपरेंडी’ होती. संशयित आपण लोन कंपनी, अॅमेझॉन मुख्यालय कर्मचारी, बँक कर्मचारी, सरकारी एजन्सी व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजंट्सची तोतयागिरी करून अमेरिकेतील निष्पाप लोकांची फसवणूक करायचे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.