Margao: कामतांचे हेतुपुरस्‍सर दुर्लक्ष, मुद्दाम कामे अडवतात; मडगावात कुरतरकर बहीण- भावाचा भाजपला रामराम

Margao Digabar Kamat: त्यांनी लोकसभा निवडणुकीआधीच राजीनामा दिला होता, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.
कामतांचे हेतुपुरस्‍सर दुर्लक्ष, मुद्दाम कामे अडवतात; मडगावात कुरतरकर बहीण- भावाचा भाजपला रामराम
Digambar Kamat And Ketan KurtarkarDainik Gomantak

मडगावात भाजपचे जे काेण मूळ कार्यकर्ते आहेत त्‍यांच्‍याकडे आमदार दिगंबर कामत हे हेतुपुरस्‍सर दुर्लक्ष करतात आणि जुन्‍या कार्यकर्त्‍यांची कामे मुद्दामहून अडवून ठेवतात, असा आरोप करुन भाजपच्‍या मडगाव मंडळाचे सरचिटणीस केतन कुरतरकर आणि त्‍यांची नगरसेविका असलेली बहीण डॉ. सुशांता कुरतरकर यांनी आज भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

आपण जी प्रतिक्रिया व्‍यक्‍त करतो, ती फक्‍त माझी वैयक्‍तिक नाही तर मडगावातील कित्‍येक जुन्‍या भाजप कार्यकर्त्‍यांची हीच व्‍यथा आहे. उलट दिगंबर कामत यांच्‍याबरोबर काँग्रेसमधून आता भाजपात आले आहेत, त्‍यांचाच उदाे उदो जास्‍त होतो.

मडगावातील कित्‍येक जुने भाजप कार्यकर्ते या अशा चुकीच्या वागणुकीमुळे अस्‍वस्‍थ झाले आहेत. लाेकसभा निवडणुकीत मडगावात भाजप उमेदवाराला एवढी कमी मते पडण्‍यामागेही तेच मुख्‍य कारण असल्‍याचे कुरतरकर यांनी सांगितले.

केतन कुरतरकर हे मडगाव पालिकेचे माजी नगरसेवक असून यावेळी त्‍यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव असल्‍याने त्‍यांची बहीण डॉ. सुशांता कुरतरकर या भाजपच्‍या पॅनलवर त्‍या प्रभागातून जिंकून आल्‍या आहेत.

कामतांचे हेतुपुरस्‍सर दुर्लक्ष, मुद्दाम कामे अडवतात; मडगावात कुरतरकर बहीण- भावाचा भाजपला रामराम
Mining Transport: खनिज वाहतूकप्रश्‍नी सरकारला कानपिचक्या! कोर्टाने केल्या महत्वाच्या सूचना

सत्ताधारी गटात असूनही भांडावे लागे !

सत्ताधारी गटात असूनही जर भांडून कामे करून घेण्‍याची वेळ येत असेल तर विराेधी गटात बसून भांडून कामे करून घेणे कित्‍येकपटीने चांगले,असे वाटल्‍यामुळेच राजीनाम्याचा निर्णय घेतला. त्‍यापूर्वी आमच्‍या कार्यकर्त्‍यांशी सल्‍लामसलतही केली, असे केतन कुरतरकर यांनी सांगितले.

भाजप साेडल्‍यानंतर तुम्‍ही आणखी कोणत्‍या पक्षात सामील हाेणार, असे विचारले असता, पर्याय खुले आहेत. मात्र आमच्‍या कार्यकर्त्‍यांना आणि हितचिंतकांना विचारूनच याेग्‍य ताे निर्णय घेऊ, असे त्‍यांनी सांगितले.

भाजप प्रवेशासाठी अनेक इच्छुक ः तानावडे

मडगावचे माजी नगरसेवक व भाजप मंडळाचे सरचिटणीस केतन कुडतरकर यांनी आज भाजपचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले असले तरी त्यांनी लोकसभा निवडणुकीआधीच राजीनामा दिला होता, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.

मडगावात आजी-माजी नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, डॉ. सुशांता याही पक्षापासून दूर जात होत्या.

आज त्यांनी राजीनामा दिला असेल. या साऱ्याची पक्षाने नोंद घेतली आहे. मडगावात भाजप प्रवेशासाठी अनेक इच्छुक आहेत.याचा प्रभाव पक्षाला जाणवू नये, ही पक्ष जरूर काळजी घेईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com