Leopard in Poinguinim: पैंगीण येथे विहीरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान!

विहीरीत पडलेल्या बिबट्याला वन कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले.
Leopard Rescue in Poinguinim
Leopard Rescue in PoinguinimDainik Gomantak

Leopard Rescue in Poinguinim

गाळये-पैंगीण येथे काल (3 फेब्रुवारी) एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. याबाबत विहीरीत पडलेल्या बिबट्याला वन कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले.

उपलब्ध माहितीनुसार, ही घटना रात्री घडली असून सावज हेरताना तो विहीरीत पडला असल्याचे बोलले जात आहे.

स्थानिकांनी यांची माहिती वनखात्याला देताच वनकर्मचाऱ्यानी पिंजरा विहीरीत टाकून बिबट्याला महत्प्रयासाने विहिरी बाहेर काढण्यास यश मिळविले. या बिबट्याची भोंडला अभयारण्यात रवानगी करण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यानी सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com