राज्यात एप्रिलपासून वन खात्याची मरीन रेंज

मुख्य वन्यजीव संरक्षक संतोष कुमार: किनारी जलचरांच्या संरक्षण, संवर्धनाचे उद्दिष्ट
Forest Department
Forest DepartmentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्याला समृद्ध निसर्ग वारसा लाभला आहे. 110 किलोमीटर लांबीची समुद्र किनारपट्टी मिळाली असून त्यात मोठ्या प्रमाणात जलजीवन आहे. त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी येत्या एप्रिलपासून नवी किनारपट्टी वन विभाग (मरीन रेंज) सुरू करण्यात येईल. यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती राज्याचे मुख्य वन्यजीव संरक्षक संतोष कुमार यांनी दिली आहे. ते पणजीत बोलत होते.

Forest Department
ताळगावात आजपासून फर्निचर फेअरचे आयोजन

वन विभागाच्या उत्तर गोवा विभागाच्यावतीने पणजीत जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात आला. प्रामुख्याने समुद्रीजीव आणि किनारपट्टीवरील जलजीवन संरक्षण यावर विशेष कार्यक्रम झाला. यात दृष्टी लाईफगार्ड, टेरा कॉन्शियसच्या , रिफवॉच या संस्था सहभागी झाल्या होत्या. यावेळी उप वनसंरक्षक सौरभकुमार, ए जेबेस्टीन उपस्थित होते.

यावेळी संतोष कुमार म्हणाले, राज्याला मोठी किनारपट्टी लागून सुद्धा मरीन लाईफ म्हणजेच किनारी भागातील जलजीवन दुर्लक्षित राहिले आहे. यासाठी वन विभागाने या जलचरांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी हा पुढाकार घेतला. नव्या मरीन रेंजमुळे किनारपट्टी भागातल्या वन्यजीववर जादा लक्ष केंद्रीत करता येणार आहे.

Forest Department
मडगाव कार्निव्हल चित्ररथ स्पर्धेत फोंड्याचा ‘जी बॉईज’ प्रथम

यावेळी टेरा कॉन्शियसच्या पूजा मित्रा, रिफवॉच मनिषा राव, दृष्टी लाईफगार्डचे अमित शिंदे आणि वन विभागाचे परेश परोब यांची विशेष सत्र झाली. यावेळी नितेश नाईक, जॉन फर्नांडिस यांच्यासह काणकोण, पेडणे, मोरजी, पणजी, खोतीगाव येथील अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध वस्तुंचे वाटप

यावेळी महिलांना मध गोळा करण्यासाठी मधमाशी बॉक्सचे वाटप केले. किनारपट्टीवर आलेल्या जलचरांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी दृष्टी जीवरक्षकांना पाण्याच्या टाक्या तसेच जखमी पक्षांना तात्पुरत्या निवाऱ्यासाठी पिंजरे देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com