Goa Assembly: हॉटेल्‍स, मोठ्या प्रकल्‍पांना वीज निर्मितीची सक्ती करा

Goa Legislative Monsson Session 2024: मोठी राज्ये सौरऊर्जानिर्मितीबाबत आराखडे तयार करतात तर गोव्यासारखे छोटे राज्य का करू शकत नाही? लोबो यांचा सवाल
Goa Legislative Monsson Session 2024: मोठी राज्ये सौरऊर्जानिर्मितीबाबत आराखडे तयार करतात तर गोव्यासारखे छोटे राज्य का करू शकत नाही? लोबो यांचा सवाल
carlos ferreira, michael lobo Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: उत्तर गोव्यातील समुद्रकिनारी भागात येत्या दोन वर्षांत वीस हजार खोल्या तयार होणार आहेत. त्यांना वीज कुठून देणार आहात? त्‍यामुळे हॉटेल्‍स आणि अशा प्रकल्पांना सौरऊर्जा निर्मिती करून त्यांची ऊर्जेची गरज त्यांनीच भागवणे सक्तीचे करावे, अशी सूचना कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी आज विधानसभेत केली. वीज‌, नवीन व अक्षय ऊर्जा खात्यांच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेत ते बोलत होते.

लोबो म्हणाले, माझे विजेवरील वाहन आज घरी आले असेल. मी उद्या ते घेऊन येईन. विधानसभा संकुलातील चार्जिंग स्टेशन सुरू तरी आहे का? मला येण्या-जाण्याच्या मार्गावर चार्जिंग स्टेशन्स कुठे दिसत नाहीत. वाहन चार्जिंग करण्यासाठी घरी जायला नको.

सरकारने जनतेसमोर आदर्श ठेवावा. विधानसभा संकुलावर सौरऊर्जा निर्मिती पॅनल बसवले तर त्यातून चांगला संदेश जाईल. मोठी राज्ये सौरऊर्जानिर्मितीबाबत आराखडे तयार करतात तर गोव्यासारखे छोटे राज्य हे का साध्य करू शकत नाही? असा सवाल लोबो यांनी केला.

वीज खांबांवरही जाहिरात फलक; पर्यटनाला धोका

वीजखांबांवरही आता जाहिरात फलक झळकू लागले आहेत. या फलकांमध्‍ये निसर्गसंपन्न गोवा हरवला चालला आहे, अशी खंत हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी विधानसभेत व्‍यक्त केली. वीज, नवीन‌ व‌ अक्षय ऊर्जा खात्याच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेत ते बोलत होते.

अशा फलकांचा फटका पर्यटनाला बसत आहे. अनेक पर्यटकांना गोव्‍यात छायाचित्रे टिपायची असतात. मात्र त्याचवेळी हे लटकणारे फलक आडवे येतात. या फलकांपासून भले सरकारला महसूलही मिळत असेल, मात्र फटका बसू लागला आहे, असे फेरेरा म्‍हणाले.

Goa Legislative Monsson Session 2024: मोठी राज्ये सौरऊर्जानिर्मितीबाबत आराखडे तयार करतात तर गोव्यासारखे छोटे राज्य का करू शकत नाही? लोबो यांचा सवाल
Goa Assembly: तम्नार प्रकल्प गोव्यासाठी आवश्‍यकच; १५० मेगावॅट वीजनिर्मितीचे लक्ष्य

वीज चोरीच्या घटना रोखणे गरजेचे

शेतीसाठी वीजजोडण्या घेतल्‍या जातात, पण वापर होतो दुसऱ्याच व्यवसायासाठी. तसेच मीटर बंद ठेवून चिऱ्यांच्या खाणींवर वीज वापरली जाते. मीटर रीडर हे मीटर बंद असल्याचे नोंदवितात आणि तेथून निघून जातात. त्यामुळे अशा प्रकारची वीज चोरी करणाऱ्यांचे फावते.

त्‍याकडे गांभीर्याने लक्ष दिल्‍यास राज्‍याची किती तरी वीज वाचेल, अशी सूचना आमदार गणेश गावकर यांनी आज विधानसभेत केली. दरम्यान, वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या कामाचे आमदारांकडून कौतुक करण्यात आले.

वीज आणि अक्षय ऊर्जा खात्यावरील कपात सूचना-मागण्या पाठिंबा व विरोध या सत्रात गावकर बोलत होते. सावर्डे मतदारसंघात वीज खात्याने केलेल्या कामांबाबत त्‍यांनी समाधान व्‍यक्त केले. आमदार दिलायला लोबो यांनी सांगितले की, वेर्ला-काणका, हणजुणे, आसगाव, मार्ना-शिवोली या गावांत भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. ओशेल आणि सडये या दोन्ही गावांमध्‍ये ते बाकी आहे. सौरऊर्जेवरील पथदीप उभारावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com