Shankhasur in Goa : कोकणी-मराठी विनोदी संवादामधून रंगणारा शंखासूर तुम्हाला माहितीए का?

काल्यातली शंखासूर आणि हरदासामधली किंवा शंखासुर आणि देवामधल्या संवादांची जुगलबंदी प्रेक्षक कान देऊन ऐकतात आणि त्यातील विनोदाचा मनमुराद आनंद घेतात.
Shankhasur in Goa
Shankhasur in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

हरदास: माझ्या भरल्या सभेत आगंतुकपणे येऊन धिंगाणा घालणारा तू कोण?

शंखासुर: (कोकणीत) तू म्हाका वळखना? तुजो बापूय हाव.

किंवा,

विष्णु अवतार: अरे, ब्रह्मदेवाचे वेद जे तू चोरून नेले आहेस ते लवकर आणून दे. नाहीतर तुझे शतखंड करीन!

शंखासुर: ( कोकणीत) शतखंड करतलो? कसो करतलो रे तू शतखंड? शेतां आता उरल्यात खंय?

अशा कोकणी-मराठी विनोदी संवांदांमधून रंगत जाणाऱ्या काल्याचे वेध, कार्तिक मास सुरू झाला की गोव्यातील अनेक गावांना लागतात. या महिन्यात वेगवेगळ्या देवालयात कालोत्सव साजरा करण्यात येतो. काल्यातली शंखासूर आणि हरदासामधली किंवा शंखासुर आणि देवामधल्या संवादांची जुगलबंदी प्रेक्षक कान देऊन ऐकतात आणि त्यातील विनोदाचा मनमुराद आनंद घेतात. काल्यामधले काही विनोद वर्षानुवर्षे चालत आलेले असले तरी त्यातली अवीट गोडी कमी झालेली नसते.

गोव्यातील विविध भागातून सादर होणारा हा काला काणकोण तालुक्यातही आयोजित होतो. वेगवेगळ्या भुमिकांसाठी आवश्यक असणारे पारंपारिक मुखवटे देवालयात तयार असतात. पैंगीण येथील श्री वेताळ देवालय, पणसखंडे येथील श्री व्यंकटेश देवालय, तसेच मल्लिकार्जुन देवालयात हे मुखवटे आहेत. हे टिकावू मुखवटे लाकडाचे असून ‘दाबण’ नावाच्या टणक लाकडापासून तयार केलेले आहेत. पात्रांना शोभतील अशा प्रकारे ते रंगार्यांकडून रंगवून घेतले जातात. श्री गणेशाचा मुखवटा त्यामध्ये महत्वाचा असतो. त्याचप्रमाणे कुड्डमाती, भट, म्हातारी, पुतना, श्रीकृष्ण या पात्रांचेही मुखवटे असतात. शंखासूर काल्यात सुत्रधार म्हणजेच हरदासाची भुमिका मुख्य असते. श्री गणेशाचा धावा करून हरदास शंखासुर काल्याला सुरूवात करतो. श्री गणेश पुजन एका आगळ्या पद्धतीने झाल्यानंतर एकामागोमाग एक पात्रे येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.

Shankhasur in Goa
Goa Congress Rebel : बंड करुन ‘त्या’ आठ आमदारांनी काय साध्य केलं?

शंखासुराने वेद चोरून नेलेले असतात. त्या कथानकाभोवती हा काला फिरतो. त्यामध्ये आख्यान असते. पुतना श्रीकृष्णाचा वध करण्याच्या इराद्याने त्याला स्तनपान करते. मात्र या प्रसंगात शेवटी श्रीकृष्णाकडून पुतनेचा वध केला जातो. त्यानंतर शंखासूराचे आगमन होते. कापडी मुखवटा व काळा वेष परिधान करून तो प्रवेश करून हैदोस घालतो. त्याच्या बरोबर दिवटीधारक असतो. हरदास वेगवेगळी प्रलोभने दाखवून त्याला भुलवून ठेवतो. काला हा लोकनाट्य प्रकार अद्यापही काणकोणात करमणूक म्हणून लोकप्रिय आहे. पखवाज, टाळ व हार्मोनियम या वाद्यांची साथ काल्याला असते.

-सुभाष महाले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com