Bicholim News : डिचोली शांतादुर्गा परिवारातर्फे शाळांना प्रथमोपचार साहित्य

Bicholim News : प्रथमोपचार साहित्य वितरण कार्यक्रमास पुरस्कर्ते दीनानाथ तारी यांच्यासह शांतादुर्गा परिवाराचे अध्यक्ष विजय सरदेसाई, सचिव अभिजीत तेली, व्यवस्थापक दिनेश मयेकर आणि मुख्याध्यापिका एडना रॉड्रिग्ज तसेच विविध शाळांचे प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शाळा प्रमुखांकडे हे साहित्य वितरीत करण्यात आले.
Bicholim
BicholimDainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, शांतादुर्गा परिवारतर्फे डिचोली शहरातील शाळांना प्रथमोपचार साहित्य (फस्ट एड बॉक्स) देण्यात आले आहेत. शुक्रवारी शांतादुर्गा विद्यालयात आयोजित कार्यकमात हे साहित्य वितरीत करण्यात आले. वृंदा दीनानाथ तारी स्मरणार्थ दीनानाथ तारी यांनी हे साहित्य पुरस्कृत केले आहे.

प्रथमोपचार साहित्य वितरण कार्यक्रमास पुरस्कर्ते दीनानाथ तारी यांच्यासह शांतादुर्गा परिवाराचे अध्यक्ष विजय सरदेसाई, सचिव अभिजीत तेली, व्यवस्थापक दिनेश मयेकर आणि मुख्याध्यापिका एडना रॉड्रिग्ज तसेच विविध शाळांचे प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शाळा प्रमुखांकडे हे साहित्य वितरीत करण्यात आले.

Bicholim
Goa Loksabha Election Result: दक्षिण गोव्यात अल्पसंख्याकांची एकजूट ठरली महत्त्वाची; सासष्टीचा गड सर

छत्रपती शिवाजी महाराज सरकारी शाळा, बोर्डे सरकारी शाळा, अवरलेडी, राधाकृष्ण विद्यालय तसेच शांतादुर्गाची सर्व विद्यालये व शहरातील शाळांना हे साहित्य देण्यात आले आहे. खेळता बागडताना विद्यार्थी जखमी झाल्यास तातडीने प्रथमोपचार करता यावेत. म्हणून हे साहित्य देण्यात आले आहे. प्रत्येक शाळेत ही व्यवस्था असणे आवश्यक आहे, असे दीनानाथ तारी यांनी सांगितले. सूत्रसंचालन परी महांब्रे यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com