पणजी: राज्यातील सध्याची पावसाची आकडेवारी पाहता अद्याप हवा तेवढा पाऊस झालेला नाही. यंदा राज्यात मुबलक प्रमाणात पाऊस बरसण्याची शक्यता देखील कमीच आहे. गत तीन वर्षांच्या तुलनेत यंदा घट होणार असल्याचा अंदाज आहे.
(Compared to the previous three years, will the rainfall decrease this year)
तीन वर्षांपासून राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत होता. 2019 साली +33%, 2020 साली +41टक्के तर गेल्या वर्षी म्हणजे 2021 साली +6 टक्के पाऊस बरसला. त्यापूर्वी राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. 2015 ते 18 पर्यंत सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडला. यंदा देशात सुमारे 103 टक्के पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पण राज्यात कमी पाऊस होत आहे. आतापर्यंत राज्यात 2329.2 मिलिमीटर (91.70 इंच) पाऊस बरसला आहे. आतापर्यंत 2532.2 मि. मी. (99.69 इंच) पाऊस अपेक्षित होता.
राज्यात सरासरी पावसाचे प्रमाण ३००७ मिलिमीटर (११८.३८ इंच) एवढे आहे. यंदा राज्यात २४३४ मि.मी. ते ३५७८ मि.मी.(९५ ते १४० इंच) दरम्यान पाऊस बरसेल. जो सरासरी पाऊस मानला जातो. मात्र, गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा पावसात घट होणार असल्याचे दिसून येत आहे. -एम. राहुल, वैज्ञानिक पणजी वेधशाळा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.