GMC Controversial Note:...तर गोमेकॉ बाहेरील खाद्य पदार्थाचे गाडे सील करा, FDA कडून तपासणीचे आदेश

सर्व वादानंतर आता अन्न व औषध प्राधिकरणाने GMC बाहेरील सर्व खाद्य पदार्थांच्या तपसणीचे आदेश दिले आहेत.
GMC Controversial Note
GMC Controversial Note
Published on
Updated on

GMC Controversial Note

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटल बाहेर असणाऱ्या खाद्य पदार्थाचे गाडेधारक पिण्यासाठी योग्य नसणाऱ्या अस्वच्छ पाण्याचा वापर करत असल्याचा खळबळजनक खुलासा गोमेकॉने केला होता. नोडल अधिकारी डॉ. उदय काकोडकर यांनी याबाबत एक नोट प्रसिद्ध केली होती.

नोट केवळ अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी होती असे सांगून गोमेकॉने वादग्रस्त नोट मागे घेतली. या सर्व वादानंतर आता अन्न व औषध प्राधिकरणाने GMC बाहेरील सर्व खाद्य पदार्थांच्या तपसणीचे आदेश दिले आहेत.

GMC Controversial Note
GMC Controversial Note

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटल बाहेर असणाऱ्या खाद्य पदार्थाचे गाडे आणि हॉटेल धारक पिण्यासाठी योग्य नाही असे पाणी वापरतात. याच पाण्याचा वापर करुन ते खाद्यपदार्थ बनवत आहेत. त्यामुळे गोमेकॉच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी याची दखल घेऊन GMC बाहेरील गाडे आणि हॉटेलमधील खाद्य पदार्थ खाऊ नये तसेच पाणी देखील पिऊ नये अशी नोट प्रसिद्ध करण्यात आली होती.

विरोधकांनी याप्रकरणी आवाज उठवल्यानंतर गोमेकॉने ही वादग्रस्त नोट मागे घेतली. तसेच, ही नोट केवळ अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी होती असाही खुलासा करण्यात आला.

आता या प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दखल घेतली असून, GMC बाहेरील खाद्य पदार्थाच्या सर्व गाड्यांची तपासणी करण्याचे आदेश जारी केले आहेत.

गाड्यांवर अस्वच्छ पाण्याचा वापर होत असल्यास त्यांना तात्काळ सील करावे, असे आदेश FDA ने दिले आहेत. आरोपांची चौकशी करण्यासाठी डीन यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. आज (शनिवारी) सायंकाळपर्यंत यासंबधित अहवाल सादर करण्याचे आदेशही FDA ने दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com