‘FDA’ची गोव्यातील तीन उद्योगांविरुद्ध दंडात्मक कारवाई

कमी दर्जाचा उत्पादन पुरवठा केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई
FDA
FDA Dainik Gomantak
Published on
Updated on

अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील एक व गोव्यातील दोन उद्योगांविरुद्ध कमी दर्जाचा उत्पादन पुरवठा केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे. नागपूर येथील अदानी विल्मर लि. आणि आके-सासष्टी येथील मे. राजपुरोहित स्वीट मार्टला एक लाखांचा तर राजपुरोहित व सन्मा स्वीट मार्टला दुकानांना अनुक्रमे 5 हजार व 30 हजाराचा दंड ठोठावला आहे.

FDA
Gomantak Tanishka : चला बदल घडवू या...वडाचे झाड लावू या

कमी दर्जाचे फॉर्च्युन प्लस रिफायईन्ड सोयाबीन तेलाचे उत्पादन तयार करून विक्री केल्याबद्दल अदानी विल्मर ली., मालेगाव-नागपूर या उद्योगाला दोषी धरून ही कारवाई केली आहे. कमी दर्जाची पापडी, खारेगाठी, भावनगरी शेव तयार करून विक्री केल्याबद्दल मे. राजपुरोहित स्विट मार्ट, शॉप नं.२, पांडव अपार्टमेंट, आके-सासष्टी यांच्याविरुद्ध कारवाई करून ५ हजार रूपये दंड ठोठावला आहे. तसेच ‘गाठी’ तयार करून विक्री केल्याबद्दल सन्मान स्विट मार्ट, शॉप नं. ४४, अपना बाजार, वास्को या आस्थापनाला३० हजारांचा दंड ठोठावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com