Goa IIT: सांगेत वादळापूर्वीची शांतता; शैक्षणिक प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी उतरले रस्‍त्‍यावर!

Sanguem IIT: पोलिसांचा कडक बंदोबस्‍त तैनात करण्यात आला आहे.
IIT Goa
IIT Goa Dainik Gomantak

Sanguem: आयआयटी या शैक्षणिक प्रकल्पाला सांगेत दिवसेंदिवस विरोध वाढत चालला आहे. आता तर शेतकरी रस्‍त्‍यावर उतरले आहेत. त्‍यांचा विरोध मोडून काढण्यासाठी सरकारने प्रकल्पाच्या सीमांकन भागात 144 कलम लागू करून शेतकऱ्यांना एकत्र येण्यास मज्जाव केला. त्‍यामुळे आज विरोध करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर, शेतात उतरले नाही. परिणामी या भागात आज शांतता दिसून आली.

ज्या भागात शेतकरी आयआयटीला विरोध करण्यासाठी शेताच्या वाटेवर उभे ठात होते, त्याच वाटेवर आज सकाळी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्‍यात आला. पाचपेक्षा अधिक शेतकरी एकत्र येऊ नयेत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशामुळे आयआयटी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उघडपणे कोणीही रस्त्यावर उतरले नाही.

IIT Goa
Bank Robbery: केरी-सत्तरी स्टेट बँकेत चोरी; शाखा व्यवस्थापकसह दोघे ताब्यात

गेले चार दिवस आयआयटी प्रकल्‍पाला विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून शेतकरी आपल्या पद्धतीने विरोध करीत होते. पण वाढत चाललेला विरोध मोडून काढण्यासाठी प्रकल्पासभोवताली जमावबंदी आदेश लागू केला आहे. परिणाम म्हणून कोणीही शेतकरी आज विरोध करण्यासाठी घराबाहेर पडला नाही.

सर्व्हेक्षण पूर्ण झाले असल्याचे सर्व्हे अधिकारी सांगत असले तरी आता प्रकल्पासाठी अधिक जमीन लागेल म्हणून नवीन भागातील जमिनीचे सर्व्हेक्षण पोलिस बंदोबस्तात करण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. नवीन सर्व्हेक्षण करणाऱ्या कामाला शेतकरी विरोध करतील हा अंदाज लक्षात घेऊन प्रकल्पाच्या सभोवताली 144 कलम लागू करण्यात आले आहे.

IIT Goa
100 वर्षांची परंपरा असलेल्या सडा येथील गणेशोत्सवाची आज सांगता

आणखी दोघे ताब्यात: संजय मापारी आणि फिलिप वाझ या दोघांना आज सांगे पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्‍या कलमाखाली अटक केली. त्‍यामुळे अटक झालेल्‍यांची संख्या आता तीनवर पोचली आहे. समन्स काढलेल्यांपैकी अजून काहीजण पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. धरपकड सत्रामुळे शेतकऱ्यांत प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com