Rice Harvesting : काणकोणात भात कापणीस सुरवात; शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची धास्ती

Rice Harvesting : या मशिनद्वारे भात कापणीबरोबरच मळणीही ताबडतोब होत असल्याने शेतकऱ्यांना धान्य त्याच दिवशी घरी नेण्यास मिळत आहे.
Rice Harvesting :
Rice Harvesting :Dainik Gomantak
Published on
Updated on

Rice Harvesting

काणकोण, वायंगण भातशेतीच्या कापणीस सुरवात झाली आहे. मात्र, अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून हार्वेस्टिंग मशिनद्वारे भात कापण्यास प्राधान्य दिले आहे.

या मशिनद्वारे भात कापणीबरोबरच मळणीही ताबडतोब होत असल्याने शेतकऱ्यांना धान्य त्याच दिवशी घरी नेण्यास मिळत आहे.

काणकोणात गेल्या दहा दिवसांपासून वायंगण शेतीत भात कणसे पिकू लागली होती. यंदा अवकाळी पावसामुळे वायंगण शेतीच्या लागवडीस उशीर झाला होता. त्यामुळे ऐन दाणे भरण्याच्या काळात शेती पाण्याविना करपून जाण्याची भिती होती, तरी यंदा त्यामानाने वायंगण शेतीला पाण्याची कमतरता भासली नाही. तरीसुद्धा बदलत्या वातावरणाचा परिणाम पिकावर झाला आहे, असे लोलये येथील विलास अय्या यांनी सांगितले.

पैंगीण पंचायत क्षेत्रातील वायंगण भाताची कापणी करण्यात आली आहे. अन्य भागात दहा पंधरा दिवसांत कापणी करण्यात येणार आहे.

मात्र, शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची धास्ती आहे. यंदा वायंगण भातशेती पीक समाधानकारक असल्याचे पैंगीण येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

शैक्षणिक संस्थांना परसबाग करण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये किंमतीची कृषी अवजारे व सेंद्रीय खते देण्याची योजना चालीस लावण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर चिटकीमिटकी, वालपापडी, अळसांदे, भेंडी, कोबी, मुळा, फ्लॉवर, काकडी, वांगी यांची बियाणी देण्यात येतात, अशी माहिती विभागीय कृषी अधिकारी नागेश कोमरपंत व साहाय्यक विभागीय कृषी अधिकारी सर्वानंद सर्वणकर यांनी दिली.

Rice Harvesting :
Goa AAP: का झाला कुजिरातील मुलांत वाद? आम आदमी पक्षाने सांगितले कारण

भाजी पिकाखालील क्षेत्रात वाढ

खरीप हंगामात २५० हेक्टर व रब्बी हंगामात ३५० हेक्टर जमीन वेगवेगळ्या भाजी पिकाखाली आहे. यंदा प्रायोगिक तत्त्वावर बारा शेतकऱ्यांना एकूण एक हेक्टर क्षेत्रात हायब्रीड जातीच्या टोमॅटोची लागवड करण्यासाठी बियाणी दिली आहेत. या रोग प्रतिकारक क्षमता असलेल्या १० ग्रॅम टॉमेटो बियाणाची किंमत एक हजार चारशे रुपये आहे. हे शेतकरी बहुतांश गावडोंगरी व खोतीगाव पंचायत क्षेत्रातील आहेत.

काणकोणात ३७६३ किसान कार्ड शेतकरी

काणकोणात काजू लागवडीखालील क्षेत्र ३५०० हेक्टर, नारळ १५० हेक्टर, ऊस लागवडीखालील क्षेत्र ६० हेक्टर, केळी १५० हेक्टर, आंबा ५०० हेक्टर, सुपारी ५० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. काणकोणात ३७६३ किसान कार्ड शेतकरी व १६०० प्रधानमंंत्री किसान कार्डधारक आहेत. खरीप हंगामात १७ हेक्टर व २३ हेक्टर शेतजमीनीत यांत्रिक पद्धतीने लागवड करण्यात येते, असे विभागीय कृषी अधिकारी नागेश कोमरपंत यांनी सांगितले.

४९ हेक्टर वायंगण क्षेत्र लागवडीखाली

काणकोणात वायंगण लागवडीखालील क्षेत्र फक्त ४९ हेक्टर आहे. खरीप भात पिकाखालील जमीन २५२० हेक्टर आहे. सध्या काणकोणात चिपळे, देवाबाग, वेलवाडा, खरेगाळ भागात वायंगण शेती केली जाते.

पाळोळे फार्मस क्लबतर्फे पडीक असलेली सुमारे ७ हेक्टर जमीन यंदा लागवडीखाली आणण्यात आली आहे, असे विभागीय कृषी अधिकारी पदाचा ताबा असलेले साहाय्यक कृषी संचालक नागेश कोमरपंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com