सत्तरी तालुक्यात अनेकांच्या बागायती केळी, सुपारी, नारळ, काजू अशा विविध पिकांनी बहरलेल्या आहेत. त्यात अधिक करुन गावठी जातींची लागवड प्रामुख्याने केली जाते. आता त्याच बरोबरच बागायतदार वर्ग नव्या संकरीत जातींकडेही लक्ष देत आहेत.
सत्तरीत (Sattari) केळी हे देखील पीक व्यवसायाच्या दृष्टीकोनातून घेतले जाते. केळी पिकाची सावरबोंडी, वेलची, सालदाटी अशा जाती लोकात प्रचलित आहेतच. त्याच बरोबरच आता टिश्यू कल्चरच्या प्रकाराची केळी पीकही घेतले जात आहे. खोडये गावातील कृष्णप्रसाद गाडगीळ यांनी प्रयोग म्हणून दहा टिश्यू पध्दतीची जी.9 या जातीची लागवड केली होती. त्यातील पाच झाडांना केळी बहरली असून सुमारे 4.5 ते 5 फूटाचे घड लगडलेले आहेत.
एक घड सुमारे वजनाप्रमाणे 40 ते 45 किलोचा मिळालेला आहे. एका घडाला 700 ते 750 नक्की मिळालेली आहेत. कृष्णप्रसाद म्हणाले की, आपण अन्य बागायती पिके देखील घेतोच. केळीच्या स्थानिक गोव्यातील (Goa) पसंतीच्या जातीही आहेत. त्यालाच जोड म्हणून टिश्यू प्रचार पद्धतीच्या केळीच्या जातीची लागवड केली, जे चांगली उत्पादन मिळाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.