Margao Crime News: मडगावातही इराणी टोळीचे चोरटे सक्रीय? या दोन घटनांधून पोलिसांना संशय

Goa News: या चोरट्यांची ‘मोडस आॅपरेंडी’ इराणी टोळीशी जुळणारी असल्‍याने त्‍या दृष्‍टीने मडगाव पोलिस तपास करीत आहेत
Goa Theft: या चोरट्यांची  ‘मोडस आॅपरेंडी’ इराणी टोळीशी जुळणारी असल्‍याने त्‍या दृष्‍टीने मडगाव पोलिस तपास करीत आहेत
Goa Theft CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Theft

मडगाव: पाॅवर हाऊस-आके येथे दुकानावर सामान नेण्‍यासाठी आलेल्‍या दोन ज्येष्ठ महिलांना पोलिस असल्‍याचे भासवून त्‍यांचे दागिने लुटण्‍याची घटना घडल्‍यामुळे मडगावातही अशा वृद्ध महिलांना लुटणाऱ्या इराणी टोळीचे चोरटे सक्रीय झाले असावेत, अशी शंका व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे. या चोरट्यांची ‘मोडस आॅपरेंडी’ इराणी टोळीशी जुळणारी असल्‍याने त्‍या दृष्‍टीने मडगाव पोलिस तपास करीत आहेत.

सोमवारी सायंकाळी ५.१५ च्‍या सुमारास ही घटना घडली होती. पॉवरहाऊस परिसरात रहाणाऱ्या मीरा कामत (७६) या आपली नणंद पुष्‍पा देशपांडे (८०) यांना घेऊन घराजवळच काही सामान खरेदीसाठी आल्या असता मोटरसायकलवरून दोघे त्‍यांच्‍याजवळ आले. तेव्हा दोघांनीही हेल्‍मेट घातल्‍यामुळे त्‍यांचा चेहरा झाकला हाेता. तुम्‍ही असे दागिने घालून फिरणे धाेक्‍याचे आहे, असे सांगू्न त्‍यांच्‍या गळ्‍यातील सोनसाखळ्या त्‍यांना काढण्‍यास सांगितले.

त्‍यानंतर कागदात गुंडाळून त्‍या चेन्‍स त्‍यांच्‍याकडे पर्समध्‍ये ठेवायला दिल्‍या. मात्र हातचलाखीने या साखळ्‍या त्‍यांनी लांबवल्‍या. अशाच प्रकारची आणखी एक घटना १३ ऑगस्‍ट रोजी ढवळी-फोंडा येथे झाली होती. तिथेही एका ७५ वर्षीय वृद्धेचे सुमारे पाच लाखांचे दागिने लुटले होते. त्‍यावेळीही असेच हेल्‍मेट परिधान करून दोघांनी वृद्ध महिलेला लुटले होते. नंतर कागदात दगड अाढळला होता.

Goa Theft: या चोरट्यांची  ‘मोडस आॅपरेंडी’ इराणी टोळीशी जुळणारी असल्‍याने त्‍या दृष्‍टीने मडगाव पोलिस तपास करीत आहेत
Margao Theft: जाब विचारण्यासाठी आला आणि रोख रकमेची बॅग हिसकावून पळाला!

आकेतील घटनेचा सर्व अंगांनी तपास!

यापूर्वी पोलिस असल्याचे भासवून कित्‍येक महिलांना लुटण्‍यात आले होते. त्‍यावेळी या चोऱ्यांत इराणी टोळीचा हात उघड झाला होता. आकेतील घटनेचा आम्‍ही सर्व कोनातून तपास करत आहोत, असे पोलिस निरीक्षक तुळसीदास नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com