Cyber Crime: सायबर गुन्हे कसे होतात? काय दक्षता घ्यावी? चतुर्थीनिमित्त्य जागृती उपक्रम

Cyber Crime Awareness: सोशल मिडियाचा जसा फायदा तसा गैरउपयोगही मोठ्या प्रमाणात होत असतो
Cyber Crime Awareness: सोशल मिडियाचा जसा फायदा तसा गैरउपयोगही मोठ्या प्रमाणात होत असतो
Goa Cyber CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

पर्ये: सत्तरीतील मोर्ले कॉलनी येथील पेशाने शिक्षक असलेले कृष्णा बाबी गावस यांच्या घरी गणेश चतुर्थीनिमित्त सायबर गुन्ह्यावर आधारित माहिती देणारे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय व सुरक्षितता यावर जागृती करणारे पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

आजची पिढी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे. सोशल मिडियाचा जसा फायदा तसा गैरउपयोगही मोठ्या प्रमाणात होत असतो. या सायबर जगतात घडत असलेले गुन्हे सर्वसामान्य लोकांना समजावे आणि त्यातून त्यांनी आपणाला सुरक्षित ठेवण्यासाठी दक्ष राहावे हा हेतू समोर ठेवून त्यांनी हे प्रदर्शन भरवले आहे.

सायबर गुन्हा पोलिस निरीक्षकाची मदत

गोवा पोलिस सायबर गुन्हा पोलिस निरीक्षक विद्यानंद पवार यांनी या गोव्यातील सायबर गुन्ह्यावर अभ्यास केला होता. त्याच्या अभ्यासाचा आधार घेत श्री गावस यांनी हे प्रदर्शन तयार केले. या प्रदर्शन तयार करताना त्त्यांनी आपली अकरावीत शिकणारी मुलगी सारा, घरातील इतर मुले अर्जुन, आस्था, सारांश यांनी सर्वांनी मिळून हे प्रदर्शन तयार केले. मागच्या वर्षी त्यांनी चांद्रयानचा देखावा केला होता.

Cyber Crime Awareness: सोशल मिडियाचा जसा फायदा तसा गैरउपयोगही मोठ्या प्रमाणात होत असतो
Cyber Crime : सावधान! फ्रॅाड कॅाल्सची दहशत सुरू

वेगवेगळ्या प्रकारचे आहेत सायबर गुन्हे

सायबर जगतात वेगवेगळे फेक साईट्स आहे. अशा साईट्समधून ग्राहकांचे पैसे लुटण्याचे काम होत असते. सायबर स्टॉकिंग, बुलिंग, विशिंग, फिशिंग, स्मिशिंग, स्पॅमिन्ग अशा प्रकारचे सायबर गुन्हे वाढत चालले आहे. या प्रदर्शनातून या गुन्ह्याबाबत माहिती मिळते. तसेच यावर प्रतिबंध आणि सुरक्षित राहण्यासाठी उपाय योजना मांडलेल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com