Goa Shigmotsav 2023: डिचोलीत सर्वत्र उत्साह

आज प्रारंभ : गावोगावी ‘घुमचे कटर घूम’
Goa Shigmotsav
Goa ShigmotsavDainik Gomantak

बालगोपाळांचा आनंद द्विगुणित करणारा आणि रंगांचा उत्सव म्हणजे शिगमोत्सव. डिचोलीत सर्वत्र शिगम्याचा उत्साह संचारला आहे. उद्या सोमवारी होळी पौर्णिमेला रात्री होळी पेटविल्यानंतर गावोगावी पारंपरिक पद्धतीने शिगमोत्‍सवाला सुरवात होणार आहे.

डिचोलीतील साळ, लाडफे, बोर्डे, सर्वण, डिचोली, कुडचिरे आदी भागांत शिगमो परंपरेप्रमाणे मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. उद्या रात्री बहुतांश भागात पारंपरिक पद्धतीने होळी रोवण्यात आल्यानंतर पूजा व अन्‍य धार्मिक विधी होती. होळी पेटविल्यानंतर गावोगावी शिगम्याचा माहोल पसरणार आहे. शिगमोत्सव साजरा करण्यासाठी गावागावांतील देवस्थान समित्या आणि गावकरी सज्ज झाले आहेत.

परंपरेप्रमाणे शिगमोत्‍सव साजरा करण्यासाठी गावागावांतील देवस्थान समित्या सज्ज झाल्या आहेत. ढोलताशे आदी चर्मवाद्यांची दुरुस्ती करून जमवाजमव केली आहे. होळी पेटविल्यानंतर गावागावांत ढोलताशांचा ‘घुमचे कटर घूम’ निनाद सुरू होणार आहे. डिचोलीतील बहुतांश भागात नऊ दिवस शिगमोत्सव साजरा करण्यात येतो.

Goa Shigmotsav
CM Dr.Pramod Sawant: ‘क्रिएटर्स कनेक्ट’द्वारे विद्यार्थ्यांना व्यावसायिक संधी

घोडेमोडणी

शिगमोत्सवात बहुतांश सर्वच भागात चोरोत्सव, शबय, रोंबाट आदी पारंपरिक प्रकार साजरे करण्यात येतात. मात्र तालुक्यातील बोर्डे, गावकरवाडा-डिचोली, लाडफे, सर्वण, कुडचिरे, मये आदी भागातील शिगम्याचे आकर्षण म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण घोडेमोडणी.

घोडेमोडणी हे त्या-त्या गावातील शिगम्याचे वैशिष्ट्य आहे. शिवाय शिगम्यात बोर्डे, सर्वणसह मोजक्याच भागात होमकुंड उत्सव साजरा करण्यात येतो. कुडणेसह विविध भागात गडेत्सव साजरा करण्यात येत असला तरी साळ गावातील हा उत्सव प्रसिद्ध आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com