Environmental Film Festival & Forum on Life
Environmental Film Festival & Forum on LifeDainik Gomantak

‘सीएमएस वातावरण’ फिल्म फेस्टिव्हल आजपासून

डॉ. वासंती राव : 15 देशांतील 25 तज्ज्ञांची उपस्थिती

देशातील प्रतिष्ठेचा ‘सीएमएस वातावरण’ फिल्म फेस्टिव्हल आज रविवारपासून पणजीत सुरू होत असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन होईल.

यात चित्रपट प्रदर्शनाबरोबर गट चर्चा, चर्चासत्र, ग्रीन फिल्म मेकिंग वर्कशॉप, ऑन द स्पॉट क्यूज स्पर्धा होणार आहेत. यात 15 देशांतील 25 हून अधिक प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहभागी होणार आहेत, अशी माहिती सीएमएसच्या संचालिका डॉ. वासंती राव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी आययूसीएन सीईसीचे अध्यक्ष सेन सौथेयही उपस्थित होते.

Environmental Film Festival & Forum on Life
Margao Municipality : मडगाव पालिकेत पेच; डेटा एन्ट्री ऑपरेटर्सचे वेतन कोण देणार?

सेन सौथेय म्हणाले, संपूर्ण जग विविध प्रकारच्या पर्यावरणीय समस्यांनी ग्रासले आहे. यासाठीच या पर्यावरणीय प्रश्नांसंदर्भात चर्चा करून उपाययोजना शोधण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट महोत्सव महत्त्वपूर्ण योगदान देतात. पर्यावरणीय समस्या लोकांपर्यंत आणि कायदेमंडळापर्यंत पोहोचविल्या जातात.

"महोत्सव गोवा मनोरंजन सोसायटी पणजी आणि बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये होत आहे. 6 आणि 7 मार्च रोजी पर्यावरणीय चित्रपटांचे प्रदर्शन होईल. याशिवाय ‘समुद्री जीवांसमोरील संकटे’ याविषयावर गटचर्चा होईल. तर तत्काळ वन्यजीव प्रश्नमंजूषा स्पर्धा होईल. याशिवाय मोजो फिल्म वर्कशॉपचे आयोजन केले असून हे वर्कशॉप दोन दिवस चालेल."

- डॉ. वासंती राव, सीएमएसच्या संचालिका

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com