Dudhsagar Open For Tourist: प्रतीक्षा संपली... बंदीनंतर दुधसागर पर्यटनासाठी खुला

खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दुधसागर धबधब्यावर पर्यटकांना बंदी घातली होती.
Dudhsagar
Dudhsagar Dainik Gomantak
Published on
Updated on

Dudhsagar Open For Tourist: पावसाळा सुरु होताच पर्यटकांना वेध लागतात ते गोव्यातील दुधसागर धबधब्याचे, पण यावेळी राज्यात धबधब्यांमध्ये पर्यटक वाहून गेल्याच्या आणि मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या.

खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दुधसागर धबधब्यावर पर्यटकांना बंदी घातली. याबाबत परित्रपक काढून पर्यटकांसाठी सूचना देण्यात आल्या. बंदीनंतर दुधसागर पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे.

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक धबधब्यांवर जात असतात. गोव्यात यावर्षी विविध दुर्घटनांमध्ये काही पर्यटक आणि स्थानिकांनी जीव गमावल्यानंतर राज्यातील वन परिसरातील धबधबे वर्षा पर्यटनासाठी बंद करण्यात आले होते. त्यात दुधसागर देखील पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला.

दरम्यान, आता तीन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर दुधसागर धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com