Francisco Colaco: अभिमान! डॉ. फ्रान्‍सिस कुलासाे ‘अमेरिकन कार्डिओग्राफी’ची फेलोशिप; सोसायटीचे 31वे फेलो

Francisco Colaco ASE fellowship: ६ सप्‍टेंबर रोजी अमेरिकेतील नेशविले येथे होणाऱ्या ‘एएसई’च्‍या वैज्ञानिक परिषदेच्‍यावेळी डॉ. कुलासो यांना ही फेलोशिप अधिकृतपणे बहाल केली जाणार आहे.
Dr. Francisco Colaco
Dr. Francisco ColacoDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मडगावस्‍थित गोव्‍यातील नामांकित हृदयरोग तज्‍ज्ञ डॉ. फ्रान्‍सिस कुलासो यांना अमेरिकन सोसायटी ऑफ इको कार्डिओग्राफी (एएसई) या जागतिक प्रतिष्‍ठेच्‍या संस्‍थेची फेलोशिप जाहीर करण्‍यात आली आहे. आतापर्यंत अशी फेलोशिप जगभरातील ३० हृदयरोग तज्‍ज्ञांना प्राप्‍त झाली असून डॉ. कुलासो हे या सोसायटीचे ३१ वे फेलो ठरले आहेत. आतापर्यंत केवळ तीन भारतीयांनाच हा सन्‍मान प्राप्‍त झाला आहे.

६ सप्‍टेंबर रोजी अमेरिकेतील नेशविले येथे होणाऱ्या ‘एएसई’च्‍या वैज्ञानिक परिषदेच्‍यावेळी डॉ. कुलासो यांना ही फेलोशिप अधिकृतपणे बहाल केली जाणार आहे. ही फेलोशिप अमेरिकेच्‍या बाहेर असलेल्‍या हृदयरोग तज्‍ज्ञांनी आपल्‍या क्षेत्रात केलेल्‍या विशेष कामगिरीसाठी दिली जात असून कुलासो यांचे या फेलाेशिपसाठी ‘एएसई’चे अध्‍यक्ष डॉ. तियोदोर अब्राहम यांनी नाव सुचविले होते.

Dr. Francisco Colaco
National Doctor's Day 2025: भारतात का साजरा केला जातो डॉक्टर्स डे? जाणून घ्या यंदाची थीम आणि महत्त्व

या फेलोशिपमुळे आता डॉ. कुलासो यांच्‍या कार्याची जागतिक स्‍तरावर दखल घेण्‍यात आली असून इटली, जपान, ब्राझील, कॅनडा आणि अन्‍य देेशांच्‍या नामांकित हृदयरोग तज्‍ज्ञांमध्‍ये डॉ. कुलासो यांचे नाव समाविष्‍ट झाले आहे. सध्‍या वयाची ८१ वर्षे पूर्ण केलेले डाॅ. कुलासो हे गोव्‍यातील पहिल्‍या फळीच्‍या हृदयरोग तज्‍ज्ञांपैकी एक असून फक्‍त गोव्‍यातच नव्‍हे तर भारतातील इतर शहरातही त्‍यांच्‍या कार्याची दखल घेतलेली आहे.

Dr. Francisco Colaco
GMC Doctor Suspended: "आरोग्यमंत्री म्हणून मी हस्तक्षेप केला, माझा सूर चुकला पण माफी मागणार नाही" डॉक्टर निलंबनप्रकरणी राणेंचे स्पष्टीकरण

गोमंतकीय असल्याचा अभिमान

ही फेलोशिप मिळाल्‍यानंतर डॉ. कुलासो यांची प्रतिक्रिया विचारली असता त्‍यांनी सांगितले की, मी कुठलाही पुरस्‍कार मिळावा यासाठी कधीही काम केले नाही. मी या वैद्यकीय क्षेत्रात काम करत राहिलो त्‍यामुळे माझ्‍या हातून लोकांची सेवा होते हीच मोठी भावना होती. आज मला हा पुरस्‍कार मिळाला असून हा जागतिक स्‍तराचा पुरस्‍कार मिळविणारा मी पहिला गोमंतकीय आहे याचाच मला अधिक आनंद आहे. हा पुरस्‍कार मी नम्रतेने स्‍वीकारताे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com