Mapus Theft: दोनापावला, म्हापसा येथील दरोड्यांचा धागा एकच? सराईत टोळीचा संशय; पोलिस यंत्रणेवर प्रचंड दबाव

Dona Paula Theft: २० आणि २१ एप्रिल २०२५ रोजी दोनापावला येथे घातलेल्या दराड्याचा अजूनही तपास सुरू असून ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
Goa Theft
Goa TheftDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या दोन थरारक घटनांनी पोलिस यंत्रणेला चक्रावून सोडले आहे. दोनापावला आणि म्हापसा येथे दोन्ही ठिकाणी झालेल्या दरोड्यांतील मोड्‌स ऑपरेंडी सारखीच असल्याचे तपासात पुढे आले असून, पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार यात एकाच टोळीचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२० आणि २१ एप्रिल २०२५ रोजी दोनापावला येथे घातलेल्या दराड्याचा अजूनही तपास सुरू असून ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दरम्यान, म्हापसा येथेही मंगळवारी अशाचप्रकारचा नियोजनबद्ध दरोडा घातल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

एप्रिल महिन्यात दोनापावला येथील नागाळी हिल्स परिसरातील उद्योगपती जयप्रकाश आणि पद्मिनी देसाई यांच्या बंगल्यात घातलेल्या दरोड्याला सहा महिने उलटून गेले तरीही पोलिसांना अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.

त्यावेळीही चार ते सात सशस्त्र दरोडेखोरांनी मध्यरात्री घरात घुसून दाम्पत्याला बांधले, सुरक्षा रक्षकाला काबूत घेतले आणि सुमारे एक किलो सोने व तीन लाख रोख घेऊन फरार झाले होते. म्हापशातील दरोड्यातही दरोडेखोरांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले होते, तर म्हापशा प्रकरणातही डीव्हीआर गायब करण्यात आला असल्याने दोन्ही घटनांतील साम्य अधिक ठळकपणे समोर आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या दोन्ही घटनांमागे प्रशिक्षित, व्यावसायिक आणि आंतरराज्यीय दरोडेखोर टोळीचा हात असण्याची शक्यता आहे. टोळीने दोन्ही ठिकाणी एकसारखी रणनीती वापरली असून प्रवेशासाठी खिडकीबाहेरील संरक्षक भाग कापला, घरातील सदस्यांना बांधले आणि धमकावले, सीसीटीव्ही रेकॉर्ड नष्ट केला आणि दीर्घकाळ (२-३ तास) घरात राहून योजनबद्ध पद्धतीने लूट केली.

Goa Theft
Mapusa Theft: ‘आवाज केला तर ठार मारू’! म्हापशातील चोरीने गोवा हादरला; चोरांनी चहा पिला, फळे खाल्ली, टॅक्सीने गाठले कर्नाटक; वाचा घटनाक्रम..

गोव्यातील दोन वेगवेगळ्या भागांमध्ये एक उच्चभ्रू नागाळी हिल्स आणि दुसऱ्या व्यापारी केंद्र म्हापसा येथे घडलेल्या या नियोजनबद्ध घटनांनी राज्यातील सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी पुन्हा उघड केल्या आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस यंत्रणेवर प्रचंड दबाव आला आहे.

Goa Theft
Goa Crime: चिंताजनक! गोव्‍यासह देशभरात महिलांवरील अत्‍याचारांत वाढ; NCRBच्या अहवालातून माहिती उघड

दरेडेखोर तांत्रिकदृष्ट्या प्रगत

l दोन्ही घटनांमध्ये दाम्पत्याला बांधणे, वृद्धांवर अत्याचार व मौल्यवान दागिन्यांची चोरी.

l सीसीटीव्ही डीव्हीआर काढून नेणे, टोळीचे व्यावसायिक प्रशिक्षण स्पष्ट.

l म्हापशातील दरोड्यानंतर डॉक्टरांच्या गाडीने पळून पणजीत ती सोडून देणे.

l तपासासाठी क्राईम ब्रांच व उत्तर जिल्हा पोलिस एकत्र.

l बेळगावमार्गे टोळीच्या हालचालींचा तपास सुरू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com