गोव्यात दिवाळीचा उदंड उत्साह!

कोरोना महामारी, आर्थिक मंदी यावर मात करून गोमंतकीयांनी गेल्या आठवडाभरात केलेली कोट्यवधींची उलाढाल वैशिष्ट्यपूर्ण ठरली.
Diwali celebrated by goa people after overcoming Corona pandemic and economic recession
Diwali celebrated by goa people after overcoming Corona pandemic and economic recessionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गेली दोन वर्षे सणासुदीवर विरजण पडले होते. कोविड महामारीने देशभरातील जनतेला त्रासून सोडल्यानंतर प्रथमच यंदाच्या दिवाळीला उत्साहाचे भरते आले. गोव्यातील बाजारपेठांमध्ये बुधवारी तोबा गर्दी दिसून आली. कोरोना महामारी, आर्थिक मंदी यावर मात करून गोमंतकीयांनी गेल्या आठवडाभरात केलेली कोट्यवधींची उलाढाल वैशिष्ट्यपूर्ण ठरली. राज्यातील मडगाव, फोंडा, वास्को आणि पणजी या मुख्य शहरांसह ग्रामीण भागही रोषणाईने न्हाऊन निघाले. दिवाळीच्या पूर्वसंध्येला सर्वत्र नरकासुराच्या धामधुमीने परिसर दणाणून गेला.

मुख्यमंत्र्यांकडून दीपावलीच्या शुभेच्छा!

दीपावलीनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी हा सण अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा, निराशेवर आशेचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक आहे. लसीकरणाद्वारे आपण कोविड महामारीच्या प्रभावातून बाहेर पडून मजबूत होत आहोत. यशाच्या मार्गातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी हा सण सामर्थ्य आणि शक्ती प्रदान करो, अशी मी प्रार्थना करतो. दिवाळीचे दिवे शांती, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य देवोत, असेही या संदेशात म्हटले आहे.

Diwali celebrated by goa people after overcoming Corona pandemic and economic recession
माझी राजकीय दिवाळी

पर्यटन क्षेत्राला उभारीचे संकेत

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या कोरोना नियंत्रित असल्याने राज्य सरकारने पर्यटन खुले केले आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढत आहे. दिवाळी सणाच्या उत्साहाबरोबरच पर्यटन क्षेत्रालाही उभारी मिळण्याचे संकेत आहेत. येत्या १० नोव्हेंबरपर्यंतचे हॉटेलचे बुकिंग फुल्ल असल्याची माहिती गोवा ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश शहा यांनी दिली.

झगमगाटाने अंधार दूर...

आकाश कंदील आणि विद्युत रोशणाईच्या साहित्याला यंदा प्रचंड मागणी वाढली होती. रंगीबेरंगी आकाशदिवे आणि रोशणाईने घरे, इमारती प्रकाशमय झाल्या आहेत. यंदा फटाक्यांमध्ये सुतळी बॉम्ब, ॲटम बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब, तरंगे, फुलबाजे, लवंगी फटाके, रंगीत फुलबाजे असे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत, अशी माहिती विक्रेत्या मनीषा देसाई यांनी दिली.

म्हापसा : म्हापसा बाजारपेठेत गर्दी होत असल्‍यामुळे व्यापारी वर्गानेही समाधान व्यक्त केले आहे. बुधवारी सकाळपासून बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी होती. रात्री उशिरापर्यंत लोक मिठाई, आकाशकंदील, कपडे, सजावटीचे साहित्य, फटाके, फुले खरेदी करत होते.

Diwali celebrated by goa people after overcoming Corona pandemic and economic recession
गोंयची दिवाळी, एक महापर्वणी!

मडगाव : मडगावात लोकांनी बाजारात आकाश कंदील व इतर साहित्य खरेदी केले. पणत्या, दिवे व इतर साहित्य खरेदीसाठी मडगावात रांगा लागल्या होत्या. दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी सोने खरेदी करण्यासाठीही लोकांनी गर्दी केली होती.

डिचोली : डिचोली शहरात सर्वत्र दिवाळी सणाचा उत्साह दिसून आला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला (बुधवारी) बाजार दिवाळीच्या साहित्याने फुलून गेला होता. त्यातच बुधवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने ग्राहकांची वर्दळ वाढली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com