Morjim News: दुरुस्तीच्या नावाखाली सहा महिने उद्यान बंद! देखरेखीचा अभाव; मोरजीत स्थानिक नाराज

Morjim Garden News: केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेतून येथील मोरजाई देवस्थान परिसरात खिंड येथे आकर्षक उद्यान उभारले, परंतु आज या उद्याची रया गेली असून गेले सहा महिने दुरुस्तीच्या नावावर हे उद्यान बंद ठेवण्यात आले आहे.
Garden At Morjim
Garden At MorjimDainik Gomantak
Published on
Updated on

Morjim Garden Closed For Repair

मोरजी: तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गोवा पर्यटन विकास महामंडळाअंतर्गत केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेतून येथील मोरजाई देवस्थान परिसरात खिंड येथे आकर्षक उद्यान उभारले, परंतु आज या उद्याची रया गेली असून गेले सहा महिने दुरुस्तीच्या नावावर हे उद्यान बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लोक नाराजी व्यक्त करीत आहेत.

मोरजी येणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांसाठी एक आकर्षक पर्यटन स्थळ ठरावे यासाठी पार्सेकर यांनी या उद्यानाची निर्मिती केली होती. त्यासाठी मोरजाई देवस्थान समितीकडे चर्चा करून देवस्थानची जमीन या उद्यानासाठी ताब्यात घेतली होती. त्यानुसार या ठिकाणी एक आकर्षक उद्यान उभारून मोरजी गावची शान वाढवण्याचा प्रयत्न केला.

परंतु या उद्यानाकडे पर्यटन महामंडळाचे दुर्लक्ष केल्यामुळे उद्यानाची स्थिती सध्या भयानक झाली आहे. बालगोपाळांच्या खेळण्याची साधने या ठिकाणी होती, त्या साधनांना गंज चढली आहे. काही घसरगुंड्या मोडकळीस आल्या आहेत. योगा सेंटरसाठी काही जागा आरक्षित ठेवली होती, त्या ठिकाणी सध्या केरकचरा साचला आहे.

हे उद्यान लाखो रुपये खर्च करून बाकीया कन्स्ट्रक्शनने उभारले होते. मात्र सुरवातीपासून या उद्यानाची देखरेख झाली नाही. सध्या हे उद्यान बाकीया कन्स्ट्रक्शनने भाडेपट्टीवर घेतल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. मागच्या सहा महिन्यापासून दुरुस्तीच्या नावाखाली उद्यान बंद ठेवले आहे. परंतु गेल्या सहा महिन्यात काहीही काम येथे झालेले नाही, त्यामुळे लोक आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत.

पर्यटन हंगामाला सुरवात झाली आहे, त्यामुळे देश विदेशातील पर्यटक येथे भेट देत आहेत, मात्र येथे आल्यावर पर्यटकांची घोर निराशा होत आहे.

Garden At Morjim
Candolim Crime: गोव्यात चाललंय काय? कांदोळी बीचवर काढली छेड, जाब विचारताच महिलेला बेदम मारहाण; परप्रांतीयांना अटक

उद्यान लवकर खुले करा; गडेकर

पंच मुकेश गडेकर यांनी सांगितले की, लाखो रुपये खर्च करून तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी हे उद्यान उभारले आणि एक चांगले पर्यटन स्थळ येथे निर्माण केले. परंतु त्यानंतर या उद्यानाची योग्य देखरेख न झाल्याने रया गेली. मुलांसाठी खेळण्याची जी साधने होती ती खराब झाली आहेत. सध्या हे उद्यान दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले आहे, ते लवकर खुले होणे आवश्‍यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com