Ponda Municipal Council Election 2023: ‘हे काय झालं?, कसं झालं? अन्‌ का झालं?’ अजूनही चर्चा सुरुच

काही व्‍यक्ती फोकसमध्‍ये; निसटलेल्या, खटकलेल्या यशापयशावर चर्वितचर्वण
Ponda Municipal Council Election 2023
Ponda Municipal Council Election 2023Dainik Gomantak

मिलिंद म्हाडगुत

फोंडा नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस उलटले तरी शहरात अजूनही खमंग चर्चा सुरूच आहे. ‘ये क्या हुआ, कैसे हुआ, क्यों हुआ?’ असे काही प्रभागांबाबत बोलले जात आहे. प्रभाग क्रमांक एक, तीन, दहा, अकरा, बारा व पंधरा हे त्‍यात प्रामुख्याने आघाडीवर आहेत.

प्रभाग एकमध्ये कृषीमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र रॉय हे भरपूर मताधिक्याने निवडून येतील अशी अटकळ बांधली जात होती. पण त्यांची आघाडी केवळ 32 मतांपुरतीच सीमित राहिली. त्यामुळे रॉय जिंकून येऊनही त्यांच्याबाबत ‘ये कैसे हुआ?’ अशी चर्चा सुरू आहे. त्यांना ‘रायझिंग फोंडा’चे नंदकुमार डांगी यांनी चांगलीच टक्कर दिली. प्रभाग तीनमध्ये ‘रायझिंग फोंडा’च्या शॅरोल डिसोझा या फक्त तीन मतांनी हरल्या.

भाजपच्या ज्योती नाईक यांनी त्यांचा पराभव केला. या प्रभागात अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या वेरोनिका डायस यांना 113 मते प्राप्त झाली. त्‍यामुळे त्या कोणाच्या विजय वा पराजयाला कारणीभूत ठरल्या यावरही उलटसुलट मते व्यक्त होत आहेत. प्रभाग दहामधील ‘हाय वोल्टेज’ लढतीचे पडसाद तर अजूनही उमटत आहेत.

Ponda Municipal Council Election 2023
Goa Accident Case: कर्नाटक-गोवा वाहतूक करणाऱ्या पिकअप अन् कारचा भीषण अपघात; गोव्यातील 5 जण गंभीर जखमी

तीच गोष्ट प्रभाग 11 ची. नगराध्यक्षांच्या या प्रभागात भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्‍यामुळे ‘ये क्यों हुआ?’ असा प्रश्न लोक विचारताना दिसत आहेत. प्रभाग १२ मध्ये काँग्रेसच्या विराज सप्रेंचा 51 मतांनी झालेला पराभवही चर्चेचा विषय बनला आहे. प्रभाग 15 मध्ये झालेली ‘टाय’ लढत अनेकांच्या उत्सुकतेचा विषय बनला असून ‘ये कैसे हुआ?’ असे लोक एकमेकांना विचारताना दिसत आहेत. त्यामुळे ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण फोंडा शहरात आहे.

निकालानंतर गाजतो आहे प्रभाग 10

यंदाच्या पालिका निवडणुकीत प्रभाग दहा हा सर्वांत महत्त्वाचा समजला जात होता. या प्रभागात भाजप व ‘रायझिंग फोंडा’ची काँटे की टक्कर होती आणि निकालाच्या दिवशीही त्‍याचा प्रत्यय आला. सुरूवातीला ‘रायझिंग फोंडा’च्या मनस्वी मामलेदार यांना तीन मतांनी विजयी घोषित करण्‍यात आले. पण नंतर झालेल्या फेरमतमोजणीत भाजपच्या दीपा कोलवेकर या एक मताने विजयी ठरल्‍या.

भाजप-काँग्रेसच्या सेटिंगमुळे आम्हाला एका मताने हार पत्करावी लागली असा आरोप मामलेदार यांचे प्रचारप्रमुख गौरेश कोलवेकर यांनी केला. त्याचबरोबर या प्रभागात भाजप प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्‍यासह राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, रवी नाईक यांनी लक्ष घातले होते. काही का असेना, निकालानंतरही हा प्रभाग गाजतो आहे एवढे मात्र खरे.

Ponda Municipal Council Election 2023
International Nurses Day 2023 :डॉक्‍टर औषधे लिहून देणार; पुढची जबाबदारी नर्सचीच!

नगराध्यक्षांची आघाडी गेली कुठे?

प्रभाग ११ हा नगराध्यक्ष रितेश नाईक यांचा प्रभाग असल्यामुळे तोही चर्चेत आहे. गेल्यावेळी रितेश यांनी ३८० मतांची आघाडी घेऊन दणदणीत विजय प्राप्त केला होता. पण यावेळी भाजपच्या उमेदवार प्रियांका पारकर या तीन नंबरवर घसरल्या. एवढा फरक कसा पडला, हा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे.

योगायोग म्हणजे २००८ साली झालेल्या पालिका निवडणुकीत प्रियांकाचे वडील नवनाथ यांनाही तिसरा क्रमांक प्राप्त झाला होता. तर, प्रभाग बारामध्‍ये ‘रायझिंग फोंडा’चे शिवानंद सावंत व काँग्रेसचे विराज सप्रे यांच्यात झालेली अटीतटीची लढतही लोकांचे लक्ष वेधून गेली. सप्रे यांचा फक्त ५१ मतांनी पराभव झाला. या प्रभागाबाबत काँग्रेसला बऱ्याच अपेक्षा होत्या. पण सावंत यांच्या अनुभवाने काँग्रेसवर मात केली. या प्रभागातही जर-तरच्या अनेक चर्चा सुरू आहेत.

प्रभाग 15 मधील ‘टाय’ लढत

प्रभाग पंधरामध्ये झालेली ‘टाय’ लढतही चर्चेचा विषय बनली आहे. या प्रभागात ‘रायझिंग फोंडा’च्या गीताली तळावलीकर व भाजपच्या संपदा नाईक यांना समान म्हणजे ४०२ मते प्राप्त झाली. नंतर लॉट्‌समध्‍ये गीताली या विजयी झाल्‍या. हा ‘मुकद्दर का खेल’ असेच म्हणावे लागेल.

विशेष म्हणजे गेल्या खेपेला याच प्रभागातून संपदाचे वडील माजी नगराध्यक्ष किशोर नाईक यांना याच गीतालींकडून केवळ तीन मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. शेवटी ‘किस्मत का खेल’ या पलीकडे या लढतीचे वर्णन करता येणार नाही.

पण तरीही लढत ‘टाय’ झाल्यानंतर लॉट्‌स टाकून विजयी उमेदवार निवडणे हे योग्य वाटत नाही. त्यासाठी कोणता तरी दुसरा मार्ग अवलंबला पाहिजे असे बऱ्याच मतदारांचे मत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com