Goa BJP: सरदेसाईंच्‍या व्यासपीठावर चढल्याने कुरतरकरांवर शिस्तभंगाची कारवाई!

भाजप आक्रमक : लवकरच नोटीस पाठवून मागविणार खुलासा
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak

Goa BJP मडगाव भाजप मंडळाचे माजी सरचिटणीस आणि माजी नगरसेवक केतन कुरतरकर हे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांच्या व्यासपीठावर चढल्याने त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची करवाई केली जाणार असल्याचे संकेत भाजपचे दक्षिण गोवा संघटन प्रभारी सर्वानंद भगत यांनी दिले आहेत.

दुसरीकडे, आपण ज्या व्यासपीठावर गेलो होतो, तो कार्यक्रम गोवा फॉरवर्डचा नव्हता तर फातोर्ड्यातील नागरिकांनी आयोजित केला होता. त्यामुळे त्या कार्यक्रमाला जाणे आपल्याला चुकीचे वाटले नाही, असा खुलासा कुरतरकर यांनी केला आहे.

फातोर्डा येथील पार्किंग प्लाझाचा ठरलेला पायाभरणी समारंभ सरकारने रद्द केल्यावर आमदार विजय सरदेसाई यांनी ‘नागरिकांनी केलेली पायाभरणी’ असे नामकरण करून आपण स्‍वत: प्रतिकात्मक पायाभरणी केली होती. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केतन कुरतरकर हे देखील होते.

याबाबत बोलताना भगत म्हणाले की, या कार्यक्रमाला कुरतरकर गेले असते तरी काही हरकत नव्हती. पण जेव्हा तेथे भाजप सरकार व भाजप आमदारावर टीका केली जात होती तेव्‍हा त्यांनी व्यासपीठ सोडून खाली येण्याची गरज होती. पण त्यांनी तसे केले नाही. याबद्दल त्यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून खुलासा मागवून घेतला जाईल.

Goa BJP
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल -डिझेलचे भाव काय? जाणून घ्या आजचे दर

दुसऱ्या बाजूने कुरतरकर यांना याबद्दल विचारले असता ते म्‍हणाले की, हा कार्यक्रम फातोर्डा येथील नागरिकांनी आयोजित केला होता. मी पूर्वी ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करायचो, त्याच्या शेजारच्या प्रभागात तो होता. या कार्यक्रमाला अनेक पक्षांचे लोक उपस्‍थित होते. मीसुद्धा होतो. त्‍यात मला वावगे काही वाटत नाही.

फातोर्डा येथील कार्यक्रमाला केतन कुरतरकर गेले असते तरी काही हरकत नव्हती. पण जेव्हा तेथे भाजप सरकार व भाजप आमदारावर टीका केली जात होती, तेव्‍हा त्यांनी व्यासपीठ सोडून खाली येण्याची गरज होती. पण त्यांनी तसे केले नाही. याबद्दल नोटीस पाठवून त्यांच्याकडून खुलासा मागवून घेतला जाईल.

- सर्वानंद भगत, भाजपचे दक्षिण गोवा संघटन प्रभारी

Goa BJP
Leopard Death: शिरवई-केपे येथे बिबट्याचा फासात अडकून दुर्दैवी अंत

त्‍या कार्यक्रमात मी सरकारवर कोणतीही टीका केलेली नाही. असे असताना मला जर पक्ष नोटीस पाठवत असेल तर त्यास मी योग्य ते उत्तर देईन. यापूर्वी दिगंबर कामत काँग्रेस पक्षात असताना त्यांच्याविरोधात मी निदर्शने केली होती. त्यावेळी मला न्‍यायालयाच्‍या नोटिशीला उत्तर द्यावे लागले होते. आता पक्षाच्या देईन.

- केतन कुरतरकर, मडगाव भाजप मंडळाचे माजी सरचिटणीस

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com