Digital literacy : मडगाव, असोचेम, गोवा राज्य विकास परिषद, डीआरडीए आणि जीएसआरएलएम यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर गोव्यात पाळी, डिचोली येथे ‘ग्रामीण उद्योजकांना डिजिटल युगात सक्षम करणे’ या कार्यक्रमाची यशस्वी सुरवात केल्यानंतर या कार्यक्रमाचा दुसरा टप्पा दक्षिण गोव्यातील काणकोण येथे, लोलये गावात सुरू करण्यात आला आहे.
या प्रकल्पाला जेनो फाउंडेशन आणि व्हीवायजीआर मीडिया हे संबंधित भागीदार म्हणून सहकार्य करीत आहेत.
काणकोण येथील लोलये ग्रामपंचायत सभागृहात, सभापती रमेश तवडकर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी डीआरडीए गोवाच्या प्रकल्प संचालक दीपाली नाईक, असोचेम गोवा राज्य विकास परिषद सक्षमीकरणाच्या अध्यक्ष पल्लवी साळगावकर, श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाच्या प्राचार्य सुचेता नाईक,व्हीवायजीआर मीडिया संस्थापक-सीईओ सोनम भगत, लोलये ग्रामपंचायतीच्या सरपंच निशा च्यारी उपस्थित होत्या.
या उपक्रमांतर्गत, तरुण डिजिटल-जाणकार विद्यार्थी स्वयंसेवक, सूक्ष्म ग्रामीण उद्योजकांना त्यांची क्षमता आणि ज्ञान वाढवण्यासाठी मदत करतील.
सूक्ष्म आणि लघु उद्योजकांसाठी त्यांची डिजिटल साक्षरता आणि कौशल्य विकास वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम होत आहे. या उपक्रमात श्री मल्लिकार्जुन महाविद्यालय, इन्स्टिट्यूट पार्टनर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.