Dwarka Nagari: ‘एनआयओ’तर्फे द्वारकानगरीचे चित्रीकरण

Dwarka Nagari: पुरातन वारसा दृष्टिक्षेपात : पृथ्वी विज्ञान मंत्रालयाला पाठविला प्रस्ताव
Dwarka Nagari
Dwarka NagariDainik Gomantak
Published on
Updated on

Dwarka Nagari:

अवित बगळे

समुद्राच्या तळाशी बुडालेल्या ऐतिहासिक द्वारकानगरीचे आता डिजिटल पद्धतीने चित्रीकरण केले जाणार आहे. गुजरात राज्यातील हा पुरातन वारसा सर्वांसमोर आणण्यासाठी दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने असे चित्रीकरण करण्याचे ठरविले आहे. त्यांनी तसा प्रस्ताव पृथ्वी विज्ञान मंत्रालयाला पाठविला आहे.

डॉ. सुंदरेश म्हणाले की, “गेल्या शतकाच्या उत्तरार्धात पुरातत्व शास्त्रज्ञांनी द्वारकानगरीचे पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून द्वारकानगरी प्रत्यक्ष होती की नव्हती, हे सिद्ध होऊ शकेल. त्यानुसार १९६० च्या दशकात पुण्यातील डेक्कन कॉलेजने पहिल्यांदा उत्खनन केले. १९७९ साली भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने आणखी एक उत्खनन केले. त्यावेळी समुद्राच्या तळाशी काही मातीची भांडी सापडली, जी इसवी सन पूर्व दुसऱ्या सहस्रामधली असावीत, असे पुरातत्व शास्त्रज्ञांना वाटते.

Dwarka Nagari
Lok Sabha Election 2024: गोव्यात 7 मे रोजी मतदान 11,7,328 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

द्वारकानगरीच्या अवतीभोवती उत्खनन आणि शोध सुरू केल्यावर विविध प्रकारचे पुरातत्व अवशेष सापडले. आतापर्यंत एकूण पाचशेहून अधिक कलाकृती सापडल्या आहेत. हे सर्व नमुने जवळपास दोन हजार वर्षांच्या सांस्कृतिक क्रमाचे अस्तित्व दर्शवितात. दगडी इमारतींचे अवशेष आणि मोठ्या दगडी बांधकामाच्या रचना पाण्याखाली सापडल्या आहेत; पण त्यांचे पृष्ठभाग उघडे असल्यामुळे इतर वस्तू तिथे आढळत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

डॉ. सुंदरेश यांच्या मते, बुडालेल्या द्वारकेच्या शोधाची पुरातत्व कार्याची सुरुवात द्वारकाधीश मंदिराजवळील उत्खननाने झाली. उत्खननात अनेक मंदिरे सापडली. याचा अर्थ समुद्राच्या पाण्याची पातळी जसजशी वाढली, तशी मंदिरे समुद्र सपाटीपासून उंच जमिनीवर हलविण्यात आली. प्रसिद्ध पुरातत्व शास्त्रज्ज्ञ डॉ. एस. आर. राव यांना बुडालेल्या द्वारकानगरीचे पुरावे सापडतात का, हे पाहण्याची कल्पना सुचली. त्यानंतरच यासंदर्भातील अभ्यास सुरू झाला.

Dwarka Nagari
Goa Accident Case: थिवी येथे अपघातात राजस्थानचा युवक ठार

अनेक गूढ रहस्यांची होणार उकल

सागरी पुरातत्व विभागाचे प्रमुख डॉ. सुंदरेश यांनी म्हणाले की, आम्ही गेल्या १५ हजार वर्षांतील समुद्राच्या पाण्याच्या पातळीच्या नोंदी केल्या. त्यावेळी समुद्राची पाणी पातळी आताच्या तुलनेत शंभर मीटर खाली होती. कालांतराने पातळी वाढली. सुमारे सात हजार वर्षांपूर्वी ती पातळी आजच्या पातळीपर्यंत पोहोचली. त्यामुळे रहस्यांची उकल होईल.

साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा उलगडा शक्य

द्वारकानगरी सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी बांधली गेली असावी. त्यानंतर समुद्राची पातळी पुन्हा वाढली, तेव्हा द्वारकानगरी पाण्याखाली गेली असावी, असा अंदाज आम्ही केलेले उत्खनन आणि संशोधनानंतर काढता येऊ शकतो. प्राचीन द्वारकानगरीतील अनेक कलाकृती पाण्याखाली सापडल्या. तेथे दगडी बांधकामे, खांब, सिंचन कालवे दिसतात. हे कोणत्या कालखंडातील आहेत याचा अभ्यास सुरू आहे, असे डॉ. सुंदरेश यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com