"स्टेन स्वामींचा मृत्यू ही एक प्रकारची हत्त्याच"

"मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी लढणाऱ्या फादर स्टेन (Sten Swamy) स्वामी यांना जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी चालू असताना मरण आले हे अत्यंत दुर्देवी"
Sten Swamy
Sten SwamyDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: न्यायालयाकडुन (Court) जामीन अर्ज मिळण्याच्या आदेशाची वाट पाहत असतानाच वयाच्या 84 व्या वर्षी फादर स्टेन स्वामी (Sten Swamy) यांना मरण आले. असंवेदनशील व बेजबाबदार भारत सरकारने आदिवासींच्या कल्याणासाठी आपले जीवन दिलेल्या एका सज्जन व दयाळू व्यक्तीची हत्त्याच केली असे म्हणावे लागेल. (Digambar Kamat paid homage to Stan Swamy)

मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी लढणाऱ्या फादर स्टेन स्वामी यांना जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी चालू असताना मरण आले हे अत्यंत दुर्देवी आहे. त्यांचे कुटूंबिय व हितचींतक तसेच अनुयायांच्या प्रती मी सहवेदना व्यक्त करतो.

Sten Swamy
Elgar Parishad Case: फादर स्टेन स्वामी यांचे निधन

आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी ते अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिले. त्यांना न्याय व दया मिळणे गरजेचे होते. भारत देशाच्या या महान नागरिकास माझा सलाम असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com