Goa: ‘डिआजीओ’ची रोजगारक्षमता कौतुकास्पद

Goa: बेतोडा-फोंडा येथे क्राफ्ट इनोव्हेशन हब कार्यरत
Diageo Craft Innovation Hub
Diageo Craft Innovation HubDainik Gomantak
Published on
Updated on

बेतोडा-फोंडा येथे नव्याने सुरू झालेल्या डिआजीओ क्राफ्ट व इनोव्हेशन हबने राज्यातील एक हजार युवकांना कौशल्य विकास आणि रोजगारक्षमतेने सक्षम करण्यासाठी चालविलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. या अत्याधुनिक प्रकल्पामुळे आयात केंद्र म्हणून गोव्यात आलेल्यांची क्षमता अधिकच वाढीस लागेल. त्यामुळे डिआजीओ इंडियाला राज्यात व आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे भवितव्य आहे, असे उद्‌गार शिरोडा मतदारसंघाचे आमदार तथा सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काढले.

Diageo Craft Innovation Hub
Mapusa Municipal Council : म्हापसा पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ; संशयितांवर गुन्हा

नुकत्‍याच झालेल्‍या या कार्यक्रमाला डिआ-जीओच्या व्यवस्थापकीय संचालक हिना नागराजन उपस्थित होत्या. शिरोडकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. फोंडा (ponda) आणि कंपनीचे नाते 52 वर्षांपासूनचे आहे. या प्रकल्पाने आपली रोजगारक्षमता सिद्ध केली असून आता नव्याने सुरू होत असलेल्या प्रकल्पातून उद्योग क्षेत्रात डिआ-जीओ इंडिया आपले वेगळे स्थान निर्माण करील, अशी आशा शिरोडकर यांनी व्यक्त केली.

Diageo Craft Innovation Hub
Thief Arrested : मोबाईल लंपास केल्याप्रकरणी चोर गजाआड

सुभाष शिरोडकर, सहकारमंत्री

राज्यातील युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी डिआ-जीओ (Diageo) इंडिया कंपनीने सुरू केलेले प्रयत्न हे खरे म्हणजे औद्योगिक क्षेत्रासाठी एक वेगळे व आदर्श उदाहरण आहे. अशा प्रकारचे कार्य इतर उद्योगांनीही करावे.

हिना नागराजन, डिआजीओ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक

डिआजीओ इंडिया (Diageo India) कंपनीने सामाजिक क्षेत्रातही उत्कृष्ट कार्य केलेले आहे. सामाजिक कार्याचा हा वसा यापुढेही सुरूच राहील. बेरोजगारी कमी करण्‍यासाठी कंपनी आणि आम्‍ही कटिबद्ध आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com