Flyover at Don Khamb: उड्डाणपुलाअभावी दोनखांब-धारगळ महामार्ग बनला धोकादायक! मूळ आराखड्याची अंमलबजावणी करा

Flyover at Don Khamb: सेवा रस्त्याचे काम ३१ डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे कंत्राटदाराने मान्य केले होते, पण तीन वर्षे होऊनही राष्ट्रीय महामार्गाच्या मूळ आराखड्याप्रमाणे काम झालेले नाही.
Flyover at Don Khamb Dhargal
Flyover at Don Khamb DhargalDainik Gomantak

Flyover at Don Khamb Dhargal 

दोनखांब - धारगळ येथील राष्ट्रीय महामार्ग ६६ वर उड्डाण पूल नसल्याने पादचारी आणि वाहनांना महामार्ग ओलांडताना धोका पत्करून व जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडावा लागतो याचा विचार करून महामार्गाचा मूळ आराखडा व यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीत झालेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी करणारे निवेदन तुये नागरिक समितीचे सचिव जुझे लोबो यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंत्याना दिले आहे.

या निवेदनात जुझे लोबो यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय चारपदरी महामार्ग ६६ च्या मूळ आराखड्यानुसार सुरक्षित वाहतुकीसाठी २० मीटर रुंदीचा उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव होता.

तथापि, २४ सप्टेंबर २०२० रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली महामार्ग बांधकाम कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत मूळ आराखड्यातील उड्डाणपुलाबाबत चर्चा झाली नाही,

तर धारगळ येथील काही स्थानिक दुकानमालकांनी घेतलेला आक्षेप लक्षात घेऊन वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षीत असे जंक्शन सिग्नल यंत्रणा महाखजनपर्यंतचा सेवा रस्ता बांधण्यात यावा यावर चर्चा झाली व योग्य डिझाइनसह पंधरा दिवसांत प्राधिकरण अभियंता यांच्याकडे देण्याचे कंत्राटदाराने मान्य केले होते.

सेवा रस्त्याचे काम ३१ डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे कंत्राटदाराने मान्य केले होते, पण तीन वर्षे होऊनही राष्ट्रीय महामार्गाच्या मूळ आराखड्याप्रमाणे काम झालेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com