Goa Mining: ..पहाटे ट्रक भरून होते मालवाहतूक! सरकारी यंत्रणा धाब्यावर बसवून चिरेखाण व्यवसाय; साकोर्ड्यातील प्रकार

Stone Mining: धारबांदोडा तालुक्यात बेकायदा चिरेखाणींचा व्यवसाय जोरात सुरू असून विशेषतः साकोर्डा भागात तर सरकारी यंत्रणेला धाब्यावर बसवून खुलेआम हा व्यवसाय सुरू आहे.
Illegal Stone Mining
Illegal Stone MiningDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: धारबांदोडा तालुक्यात बेकायदा चिरेखाणींचा व्यवसाय जोरात सुरू असून विशेषतः साकोर्डा भागात तर सरकारी यंत्रणेला धाब्यावर बसवून खुलेआम हा व्यवसाय सुरू आहे. गेल्या वर्षी साकोर्ड्यातील या बेकायदा चिरेखाणींवर खाण खात्याने छापा टाकून कारवाई केली होती;

पण या कारवाईचा कोणताही परिणाम झाला नसून पुन्हा चिरे खाणी सुरू झाल्या आहेत. फक्त वर्तमानपत्रांनी आवाज उठवल्यानंतर काही दिवस मशिनरी गुंडाळली जाते, मग काही दिवस गेल्यावर पुन्हा एकदा बेकायदा चोरीछुपे हा व्यवसाय सुरू केला जातो.

साकोर्डा भागातील शेणे-उदळशे येथील सरकारच्या वन खात्याच्या जमिनीवर हा चिरेखाणींचा व्यवसाय बिनधास्त सुरू आहे. या बेकायदा चिरेखाणींचा व्यवसाय कुणाच्या आशीर्वादाने चालतो, त्याबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असून राजरोस सरकारी मालमत्तेची लुटमार करण्याच्या या प्रकाराला आळा घालण्यात सरकारी यंत्रणा का कचरते आहे, असा सवाल साकोर्डावासीय विचारताना दिसतात.

Illegal Stone Mining
Illegal Sand Mining: तेरेखोल नदीतील बेकायदेशीर रेती उत्‍खननास सरकारी यंत्रणाच जबाबदार; न्‍यायालयाने ओढले ताशेरे

एकीकडे डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार म्हणते, बेकायदा कृत्यांना थारा नाही; पण धारबांदोडासह राज्यात इतर ठिकाणी बेकायदा चिरेखाणींसह बेकायदा रेती उत्खनन जोरात सुरू आहे. पहाटेच्या सुमारास ट्रक भरून हा माल वाहतूक केला जातो. त्यात कुणाकुणाचा सहभाग आहे, हे आता सर्वांना ठाऊक झाले असून सरकारने आता अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

Illegal Stone Mining
Shirgao Mining: 50 वर्षे जुन्या खाणखंदकापासून गावाला वाचवा, शिरगाववासीयांची मागणी; पावसात 'ओव्हरफ्लो' होण्याची भीती व्यक्त

साकोर्डा भागातील बेकायदा चिरेखाणींच्या व्यवसायावर सरकारनेच बंदी आणली पाहिजे. याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वनमंत्री विश्‍वजीत राणे तसेच स्थानिक आमदार डॉ. गणेश गावकर यांनी लक्ष घालून हा बेकायदा व्यवसाय त्वरित बंद करायला हवा ज्यामुळे सरकारी मालमत्तेची लूट रोखली जाईल.

- महादेव शेटकर, पंचसदस्य, साकोर्डा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com