Canacona: काणकोणसाठी एक हजार कोटींच्या विकास कामांना मंजुरी! रमेश तवडकर यांची माहिती

Ramesh Tawadkar: १८ दिवसांच्या विधानसभा कालखंडात काणकोणातील विकासकामांना मंजूरी मिळविण्यात आली आहे
Ramesh Tawadkar: १८ दिवसांच्या विधानसभा कालखंडात काणकोणातील विकासकामांना मंजूरी मिळविण्यात आली आहे
Ramesh Tawadkar Dainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: काणकोण मतदारसंघाच्या वाट्याला सभापतीपद आल्याने काणकोण मधील विकासकामांचे प्रश्न विधानसभेत कोण मांडणार, हा प्रश्न सदैव चर्चिला जात आहे.मात्र, त्याला चोख उत्तर देण्यासाठी गेल्या १८ दिवसांच्या विधानसभा कालखंडात काणकोणातील विकासकामांना मंजूरी मिळविण्यात आली आहे. सुमारे एक हजार कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळविण्यात आली आहे,असे सभापती रमेश तवडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवाय या पूर्वीच वीज, सार्वजनिक बांधकाम खात्याची कामे मतदार संघात मार्गी लागली आहेत.गावणे धरणाचे पाणी गावडोंगरी व खोतीगाव पंचायत क्षेत्रात पोचविण्यासाठी निविदा जारी करण्यात आली आहे,असेही ते म्हणाले.

यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष विशाल देसाई, सरचिटणीस दिवाकर पागी, उपाध्यक्ष शाबा नाईक गावकर,संजू मिळावे, प्रभाकर गावकर उपस्थित होते.

पेय जला बरोबरच जलसिंचन साठी वेगवेगळ्या ठिकाणी बंधारे उभारण्यात येणार आहेत. बेंदुर्डे ते काणकोण मनोहर पर्रीकर बगल रस्त्यापर्यंतच्या चार पदरी हमरस्त्यासाठी भूसंपादनासाठी भारतीय राजपत्रात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

सुमारे पंधरा किलो मीटर लांबीच्या चार पदरी रस्त्यासाठी ११२ सर्व्हे क्रमांकाच्या जमीन मालकांची २७..७७५हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे.त्यात शेतजमिनी व वनजमिनींचा समावेश आहे.

हा रस्ता करमलघाट क्षेत्रात काढण्यात येणार आहे. करमलघाट क्षेत्रातील रस्ता आडवळणाचा व अरूंद असल्याने वारंवार येथे अपघात होतात त्यासाठी या क्षेत्रात रस्ता रूंदीकरणाची मागणी करण्यात येत होती. तवडकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन चारपदरी रस्त्याची मागणी धसास लावली.

Ramesh Tawadkar: १८ दिवसांच्या विधानसभा कालखंडात काणकोणातील विकासकामांना मंजूरी मिळविण्यात आली आहे
Canacona News : समृद्ध काणकोणचे स्वप्न साकारू : सभापती तवडकर

माशे-पोळे महामार्गाचे चौपदरीकरण

माशे ते पोळे पर्यंतचा हमरस्ता चार पदरी करण्यात येणार आहे.बेंदुर्डे ते चाररस्ता पर्यंतच्या चारपदरी रस्त्याच्या बांधणीसाठी जमीन संपादनासाठी ७५.४६ कोटी रूपये केंद्र सरकारने मंजूर केले होते आहेत.आता कुंकळ्ळी येथील उस्किणीबांध ते बेंदूर्डे येथील जमीन चार पदरी रस्त्यासाठी संपादित करण्यात येणार आहे.त्याशिवाय माशे ते पोळे पर्यंतचा रस्ताही चारपदरी करण्यात येणार आहे.त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सभापती तवडकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com