Derogatory Post On Francis Xavier: सेंट फ्रान्सिस झेवियरबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मायणा कुडतरी पोलिसांत तक्रार दाखल

Derogatory Post On Francis Xavier: आपच्या अमित पालेकर यांनी देखील याप्रकरणी आवज उठवत कारवाईची मागणी केली आहे.
Derogatory Post On Francis Xavier
Derogatory Post On Francis XavierDainik Gomantak

Derogatory Post On Francis Xavier

सेंट फ्रान्सिस झेवियरबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिषेक बॅनर्जी विरोधात मायणा कुडतरी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोजा यांनी ही तक्रार दाखल केलीय.

आपचे गोवा संयोजक अमित पालेकर यांनी देखील याप्रकरणी शनिवारी कारवाईची मागणी केली होती.

अभिषेक बॅनर्जी याने सेंट फ्रान्सिस झेवियरबाबत आक्षेपार्ह पोस्ट करुन कॅथलिक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. बॅनर्जीने खालच्या पातळीची भाषा वापरुन समाजात दुफळी आणि अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी, बार्बोजा यांनी तक्रारीद्वारे केलीय.

Derogatory Post On Francis Xavier
Free WiFi In Panjim: स्मार्ट सिटी पणजीसह पर्वरी, बांबोळी, ताळगामध्ये 'फ्री वाय-फाय' सुविधा; जाणून घ्या झोन

दरम्यान, आपचे नेते अमित पालेकर यांनी देखील याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री प्रमोद सावंत यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पालेकर यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com