Competition Center : परवानगी नाकारल्याने स्पर्धा केंद्र बदलण्याचा शॅडो कौन्सिलचा निर्णय

स्पर्धकांचा प्रतिसाद लाभल्याने त्या रद्दही करता येत नाहीत, असे कुतिन्हो यांनी सांगितले.
Competition Center
Competition CenterDainik gomantak
Published on
Updated on

Competition Center : सासष्टी, शॅडो कौन्सिलने दिवाळीनिमित्त शनिवार, ११ नोव्हेंबर रोजी मडगावच्या लोहिया मैदानावर वेशभूषा व पणती सजावट स्पर्धांचे आयोजन केले होते. मात्र,शुल्क शुल्क भरूनही शॅडो कौन्सिलला लोहिया मैदानावर परवानगी नाकारल्याने स्पर्धा गोमंत विद्यानिकेतनलगतच्या इमारतीत घेण्याचा निर्णय घेतल्याचे कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी सांगितले.

३१ ऑक्टोबर रोजी अर्ज करून ३ नोव्हेंबर रोजी शुल्कही भरण्यात आले होते. मात्र, ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सॉलिड पार्टीने हे मैदान आरक्षित केल्याचे कारण पुढे करून शॅडो कौन्सिलला परवानगी नाकारली.

त्यामुळे आता या स्पर्धा लोहिया मैदानाऐवजी गोमंत विद्यानिकेतन लगतच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील काजा आलियादोस इथे घेण्याचा निर्णय शॅडो कौन्सिलने बुधवारी (ता.८) पत्रकार परिषदेत जाहीर केला. स्पर्धा ४ वा. सुरू होतील. स्पर्धकांचा प्रतिसाद लाभल्याने त्या रद्दही करता येत नाहीत, असे कुतिन्हो यांनी सांगितले.

Competition Center
Old Goa Accident: खोर्ली - ओल्ड गोवा येथे टेम्पो दुचाकीचा अपघात, प्रियोळचा युवकाचा मृत्यू

एरव्ही सॉलिड पार्टी गेली २६ वर्षे नरकासुर वध स्पर्धा आयोजित करीत आली आहे. यंदा हे २७वे वर्ष. मात्र, एकदाही त्यांनी लोहिया मैदान आरक्षित केल्याचे आठवत नाही. मात्र, यंदाच त्यांना ते हवे आहे. आपला त्यांना मुळीच विरोध नाही. शॅडो कौन्सिल व सॉलिड पार्टीमध्ये कुणालाही दुष्टपणा आणायचा असेल तर त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत.

- सावियो कुतिन्हो, निमंत्रक, शॅडो कौन्सिल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com