येथील केपकरवाडा नानू रिसॉर्टनजीकच्या रस्त्याला खेटून असलेला वटवृक्ष आणि तिठा येथील पिंपळ वृक्ष कलंडलेल्या धोकादायक स्थितीत असल्याने कधीही दुर्घटना घडू शकते. त्यामुळे हे वृक्ष हटविण्याची मागणी वाहनचालक आणि स्थानिकांनी केली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात हे वृक्ष जास्तच कलंडलेल्या स्थितीत दिसत असल्याने सोसाट्याच्या वाऱ्याने कधीही कोसळू शकतात किंवा दिशा बदलू शकतात, असे मत वाहनचालकांनी व्यक्त केले आहे. येथील वडाच्या पारंब्या रस्त्यावरच रुतल्याने वृक्षाचा तोल पूर्णतः रस्त्याच्या बाजूने झुकला असून, हा वृक्ष कधीही कोसळू शकतो, अशी भीती वाहनचालक दत्ताराम ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
देऊळवाडा भागातील रामचंद्र हरमलकर यांनी त्यांच्या घरानजीकचे धोकादायक झाड घरावर पडल्यानंतर याची माहिती त्यांनी अग्निशमन दलाला दिली होती. मात्र, झाडाचा वरील भाग तुम्ही कापून घ्या, जमिनीवरील बुंध्याचा भाग आम्ही कापून देऊ शकतो, एवढेच सांगून अग्निशमन दलाचे कर्मचारी वाहनासह निघून गेल्याचे हरमलकर यांनी नाराजीच्या सुरात सांगितले.
तिठा मध्यवर्ती भागातील पिंपळाचे झाड धोकादायक आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी या वृक्षाची भली मोठी फांदी कोसळली होती. सुदैवाने त्यावेळी वाहनांची वर्दळ नव्हती. त्यावेळी त्वरित वीजपुरवठा बंद केला होता. त्यामुळे मोठे नुकसान झाले नव्हते. पिंपळ झाडाचा धोका ओळखून मॉन्सूनपूर्व कामांच्या बैठकीत जिल्हाधिकारी आदींना लक्षवेधी सूचना केली होती. मात्र, प्रशासनाने वृक्ष कापण्याची तसदी न घेतल्याने संताप व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.