Delhi Police Arrest two from Goa For Human Trafficking: दिल्लीच्या पूर्व जिल्ह्यातील मयूर विहार पोलीस ठाण्याने मानवी तस्करी प्रकरणात फरार झालेल्या एका परदेशी महिलेसह गोव्यातील एकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स, इतर कागदपत्रे, त्यांचे स्वतःचे पासपोर्ट आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.
न्यायालयाने दोन्ही आरोपींना फरार घोषित केले होते. ही महिला अवैधरित्या परदेशी मुलींना भारतात आणून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत होती.
अजिझा हकीमी उर्फ अजीजा शेर (वय 36) आणि शेरजे अफगाण उर्फ शेरजोत अफगाण उर्फ नूर अहमद हकीमी (वय 25, रा. तुर्कमेनिस्तान) अशी त्यांची नावे आहेत.
मानवी तस्करीत सहभागी एक फरार विदेशी महिला आणि तिचे सहकारी गोव्यात आहेत, अशी माहिती 30 सप्टेंबर रोजी मयूर विहार पोलीस स्थानकाच्या पथकाला मिळाली.
तात्काळ एक टीम तयार करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. या दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सुमारे 200 मोबाईल क्रमांकांची तपासणी करण्यात आली.
तांत्रिक मदतीने दोन क्रमांकाच्या आरोपींची ओळख पटवून त्यांचा माग काढण्यात आला. 3 ऑक्टोबर रोजी एक पथक उत्तर गोव्यात पाठवण्यात आले. तेथून 6 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.
त्यानंतर त्यांना गोवा न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून दोघांना ट्रान्झिट रिमांडवर दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
संशयित आरोपी अजिझाविरुद्ध देशांतर्गत विमानतळ पोलिस स्टेशन, हजरत निजामुद्दीन पोलीस स्टेशन, चाणक्यपुरी आणि गुन्हे शाखा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
नूर अहमदविरुद्ध चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही न्यायालयाने फरार घोषित केले होते.
अजीजाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये ती वेश्याव्यवसायासाठी विदेशी मुलींवर जबरदस्ती करत आहे.
2016 मध्ये ते भारतात आले. यानंतर ती समीर सेजाई नावाच्या तरुणासोबत अवैधरित्या राहू लागली. नंतर तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी ती तुरुंगात गेली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ती पुन्हा समीरसोबत राहू लागली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.