Goa News: कायदेशीर कागदपत्रांचा अभाव; दवर्लीत घरक्रमांकासाठी संचालकांकडे धाव

गेल्या तीन महिन्यापेक्षा जास्त काळ घर नंबर मिळवण्यावरून दवर्ली पंचायतीचे राजकारण तापलेले आहे.
houses
housesDainik Gomantak

Goa News: गेल्या तीन महिन्यापेक्षा जास्त काळ घर नंबर मिळवण्यावरून दवर्ली पंचायतीचे राजकारण तापलेले आहे. दिकरपाल-दवर्ली पंचायतीने सर्वेक्षण करून या नागरिकांना घर नंबर देता येत नाही, असा निर्णय घेतलेला आहे.

त्यांनी बेकायदेशीरपणे शेतजमिनीत बेकायदेशीर घरे बांधली आहेत. शिवाय त्यांच्याकडे कायदेशीर कागदपत्रे नाहीत, असे पंचायतीचे म्हणणे आहे.

आता घर क्रमांकप्रश्र्नी 166 पैकी काही नागरिक पंचायत खात्याच्या अतिरिक्त संचालकाकडे गेले आहेत. त्यांनी पंचायतीने घेतलेल्या निर्णयाला आव्हान दिले आहे. काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने बेकायदेशीर घरांना ईएचएन योजने खाली घर नंबर देण्याचा कायदा संमत केला आहे.

दिकरपाल-दवर्ली पंचायतीने परिसरातील 166 घरांना असे घर नंबर देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांना एक प्रकारे फटका बसला आहे.

houses
Goa Festival: भाविकांनी उधळला गुलाल; गोव्यातील इंत्रुजोत्सवाचा समारोप

जागा मालकाची तक्रार

या संदर्भात दिकरपाल-दवर्ली पंचायतीचे सरपंच हेर्कुलान नियासो यांचे असे म्हणणे आहे, की पंचायतीने या पूर्वी सर्व घरांचे सर्वेक्षण केले आहे. काही जणांनी पंचायत खात्याच्या अतिरिक्त संचालकांकडे ही बाब नेली आहे.

या जागेच्या मालकाने तक्रार केली असून त्याप्रमाणे आम्ही पाहणी केली. पाहणी व सर्वेक्षणाचा अहवाल पंचायतीच्या बैठकीत सादर करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com